Hansika Motawani: बॉलिवूडमध्ये अशी अनेक प्रकरण गाजली आहेत ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली होती. त्यातील एक अभिनेत्री आहे ती म्हणजे हंसिका मोटवानी (Hansika Motawani Marriage). हंसिका लहानपणी तुम्ही शाकालाका बुमबुम आणि हृतिक रोशनच्या कोई मिल गया अशा लोकप्रिय प्रोजेक्टमधून पाहिले असेलच. तेव्हा तिचा चेहरा हा घरोघरी लोकप्रिय झाला होता. आता हंसिका ही खूप मोठी झाली आहे आणि तिचा विवाहसोहळाही नुकताच संपन्न झाला आहे. परंतु अभिनेत्रींचे लाईफ जितकं ग्लॅमरस असते तितकेच ते विविध कॉन्ट्रोव्हर्सीनंही (Controversies) भरलेले असते. त्यामुळे हंसिकाची ग्लॅमरस लाईफही काहीशी अशीच आहे. तिच्या आयुष्यातही अनेक वादग्रस्त मुद्दे आहेत ज्यांची वारंवार चर्चा होत असते. त्यातील एक मुद्दा म्हणजे सुंदर होण्यासाठी तिच्याच आईनं तिला हॉर्मान्सचं इंजेक्शन दिलं होतं. (fact check actress hansika motwani rumours about her mother had given her harmones injection to look like a lady)
परंतु यात काही तथ्य नाही असंही रिपोर्ट्समधून समजते. परंतु नक्की तिच्या आईनं तिला खरंच हॉर्मोन्सचं औषतिची लव्ह शादी ड्रामा ही वेबसिरिज प्रसिद्ध झाली होती या वेबसिरिजमध्ये तिच्या बॉयफ्रेंडनं तिच्या आणि तिच्या आईबद्दल (Hansika Motawani Mother) पसरवल्या जाणाऱ्या अफवांबद्दल सांगितलं होते.धं दिलं होतं का, चला तर मग या लेखातून जाणून घेऊया. तिची लव्ह शादी ड्रामा ही वेबसिरिज प्रसिद्ध झाली होती या वेबसिरिजमध्ये तिच्या बॉयफ्रेंडनं तिच्या आणि तिच्या आईबद्दल (Hansika Motawani Mother) पसरवल्या जाणाऱ्या अफवांबद्दल सांगितलं होते. त्यात ती असं म्हणते की तिची आई तिला हॉर्मान्सचं इंजेक्शन सुंदर दिसण्यासाठी द्यायची म्हणून याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या होत्या. ज्याचा तिच्यावर फार परिणाम झाला होता.
हंसिका यावेळी म्हणाली होती की, सिनेसृष्टीची ही एक नकारात्मक बाजू आहे. कारण माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या. त्यातील एक होती ती म्हणजे मी 21 वर्षांची असताना जेव्हा मी स्ट्रगल करत होते तेव्हा माझ्या आईनं मला मोठी स्त्री लवकरात लवकर होण्यासाठी हॉर्मान्सचे इंजेक्शन दिले होते. त्यावर हंसिकाच्या आई मोना मोटवानी (Mona Motawani) यांनीही स्पष्टीकरण दिले होते. त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, जर का मी माझ्या मुलीला असलं कोणतं तरी औषधं दिलं असेन तर मग मी टाटा, बिर्ला आणि अंबानी यांच्या एवढीच कोणतरी श्रीमंत असायला पाहिजे. पण आम्ही मध्यमवर्गीय आहोत. त्यातून आम्ही पंजाबी आहोत. आमच्या इथे तर मुली 12-16 वर्षीचं मोठ्या होतात. मी माझ्या मुलीला हॉमोन्स इंजेक्शन का म्हणून देईन हे कोणत्या मुर्खांनी पसरवले, त्यांनी काही मेंदू आहे की नाही?, अशा भाषेत त्यांनी नेटकऱ्यांना खडसावले होते.
हंसिकानं नुकतेच सोहेल कुथरियासोबत लग्न केले आहे. तिची लव्ह शादी ड्रामा ही वेबसिरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. 2007 साली हिमेश रशमियाच्या आप का सुरूर या चित्रपटातून तिनं मुख्य भुमिका केली होती. हंसिकानं अनेक लोकप्रिय सिनेमांतून कामं केली आहेत त्यातून तिनं साऊथच्या फिल्म्समधूनही कामं केली आहेत. तिचा MMS लीक झाल्यापासून (Hansika Motawani MMS Leak) तिनं आपल्याच मैत्रीणीचे लग्न मोडले असे आरोपही झाले आहे.