Fact Check : Samantha Ruth Prabhu पुन्हा रुग्णालयात? चाहत्यांची चिंता वाढली

Samantha Ruth Prabhu hospitalised : गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर अचानक समंथाच्या आजारपणाची बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली 

Updated: Nov 24, 2022, 12:30 PM IST
Fact Check : Samantha Ruth Prabhu पुन्हा रुग्णालयात? चाहत्यांची चिंता वाढली  title=
Fact check Actress Samantha Ruth Prabhu hospitalised post Myositis diagnosis

Samantha Ruth Prabhu hospitalised : नुकतंच अभिनेत्री समंथा रुथ प्रभू एका नव्या कारणामुळं चर्चेत आली. अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल केल्याचं म्हणत अनेक चर्चांची वादळं उठली आणि चाहत्यांची चिंता वाढली. समंथाला हैदराबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती खालावल्याचं काहींनी म्हटलं आणि सोशल मीडियावर यासंदर्भात असंख्य पोस्ट व्हायरल झाल्या. 

आजारपणातून सावरतेय समंथा (samantha ruth prabhu Myositis)

myositis चं निदान झाल्यानंतर समंथानं त्यावर योग्य उपचार घेतले. सध्या ही दाक्षिणात्य अभिनेत्री याच आजापरणातून सावरत आहे. पण, त्यादरम्यानच तिच्या प्रकृतीविषयी ही माहिती समोर आल्यामुळं अनेकांचीच चिंता वाढली. (what is Myositis?)

ती रुग्णालयात आहे की नाही? (Actress Samantha Ruth Prabhu hospitalised? )

...तर, समंथा सध्याच्या घडीला स्वत:च्या घरीच आहे. अभिनेत्रीशी संलग्न असणाऱ्या एका व्यक्तीनं यासंदर्भातील माहिती देत तिच्या रुग्णालयात असण्याची अफवा धुडकावली. 

मुलाखतीदरम्यान समंथा कोलमडली आणि... 

गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमध्ये सातत्यानं होणारे बदल पाहता समंथासाठी दरम्यानचा काळ अतिशय आव्हानात्मक होता. किंबहुना आतासुद्धा ती आजारपणातून पूर्णपणे सावरलेली नाही. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान समंथा पुरती कोलमडलेली दिसली. आजारपणाविषयी ऐकल्यानंतर आपल्या मनात 'सगळं काही संपलं...' याच भावनेनं घर केल्याचं तिनं सांगितलं. 

वाचा : रस्त्यावरच्या मुलीला आपलंसं केलं, मोठ्या मनाच्या Salim Khan यांनी 'या' लेकिला स्वत:चं नाव दिलं

'कोणाच्याही जीवनात वाईट आणि चांगले दिवस येतात. अनेकदा मला असंही वाटलं आहे, की मला जरासुद्धा हालचाल करता येणार नाही. पण, जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मी किती अंतर पुढे आलेय हे लक्षात येतं. सध्या असे अनेकजण आहेत जे विविध आव्हानांशी झुंज देत आहेत. पण, शेवटी आम्ही यश मिळवतोच..', असं म्हणत समंथाला हुंदका दाटून आला होता. 

समंथाच्या आजारपणाची माहिती मिळताच कोणी केली विचारपूस? (Samantha ruth prabhu disease)

अभिनेता नागा चैतन्य (Naga chaitanya) याच्यासोबतचं चार वर्षांचं वैवाहिक नाकं समंथानं तोडलं आणि आपली वेगळी वाट निवडली. पण, या प्रवासातही ती खचली होती. समंथाच्या आजारपणाची माहिती तिच्या Ex Husband पर्यंत आणि त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली तेव्हा ही मंडळी तिची चौकशी करण्यासाठी पुढे सरसावली (samantha ruth prabhu ex husband family). या अवघड प्रसंगात समंथासाठी हा एक मोठा आधरच होता. तिची विचारपूस करण्यासाठी मित्रपरिवारही पुढे आला. चाहत्यांनीसुद्धा या अभिनेत्रीला बळ दिलं. याच आधाराच्या बळावर समंथा संकटातून सावरेल यात शंका नाही.