Fact Check : वयाच्या 14 व्या वर्षी प्रेमात पडलेली करीन शालेय जीवनात प्रेग्नंट झाली होती?

बेबो तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा वादात सापडली आहे. 

Updated: Sep 24, 2022, 01:57 PM IST
Fact Check : वयाच्या 14 व्या वर्षी प्रेमात पडलेली करीन शालेय जीवनात प्रेग्नंट झाली होती? title=

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरला कोण ओळखत नाही, ती केवळ कुटुंबासाठीच बेबो नाही तर तिच्या चाहत्यांसाठीही आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील बेबोने नुकताच तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला. करीना कपूरच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सनीही तिला वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या.

करीना कपूर खानच्या आयुष्याशी निगडीत अनेक अफवा वादांसोबतच असल्या तरी, तिने केलेल्या वक्तव्यामुळे ती अनेकदा वादात सापडली आहे. मग ती तिच्या चित्रपटाबद्दल असो किंवा तिच्या मुलाचं नाव तैमूरसोबत. त्याबाबत ती नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

अशीच एक अफवा करीनासोबत तिच्या बालपणातही जोडली गेली होती, एका रिपोर्टनुसार, करीना कपूरचे शालेय शिक्षण जमनाबाई नरसी स्कूलमधून झालं. एंटरटेनमेंट कॉरिडॉरमधील बातम्यांनुसार, करीना कपूर इयत्ता नववी वर्गात असताना गर्भवती झाली होती. मात्र, या प्रकरणी अभिनेत्री कधीही बोलली नाही किंवा तिच्याशी संबंधित सूत्रांनीही काहीही सांगितलं नाही. पण याच्याशी संबंधित एक किस्सा असाही आहे की वयाच्या 14 व्या वर्षी करीना कपूरने एका मुलाच्या प्रेमात पडली होती. याचा खुलासा खुद्द करीना कपूरने केला आहे.  

मात्र तिची आई बबिता यांना ही गोष्ट फारशी आवडली नाही. करिनाने सांगितलं की, सिंगल मदर असल्याने तिला हे सर्व घडू द्यायचे नव्हतं, म्हणून तिने फोन तिच्या खोलीत लपवून ठेवला.

करीना यावेळी आपल्या क्रशसह पळून जाणार होती. तेव्हा तिची आई तिच्या या वागण्याने नाराज झाली आणि तिला हॉस्टेलमध्ये पाठवलं. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली की, मला त्या मुलाला भेटायचं होतं आणि म्हणूनच मी आई जेवायला बाहेर गेली असताना चाकूच्या साहाय्याने कुलूप उघडून खोलीत प्रवेश केला आणि मुलाशी फोनवर बोलले. मी त्याच्यासोबत एक प्लॅनही बनवला आणि घरातून पळून गेले." अभिनेत्रीच्या या कृत्यानंतर तिची आई बबिता कपूरने तिला डेहराडूनमधील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, करीना कपूर अलीकडेच 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही.