Fact Check : शाहरुख खानच्या लेकाचा अभिनेत्री अनन्या पांडेसोबत लिपलॉक?

अभिनेत्री अनन्या पांडे आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र आज अभिनेत्रीचा असा एक फोटो व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालादेखील धक्का बसू शकतो. 

Updated: Oct 30, 2023, 10:15 AM IST
Fact Check : शाहरुख खानच्या लेकाचा अभिनेत्री अनन्या पांडेसोबत लिपलॉक? title=

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'ड्रीम गर्ल 2' या हिट चित्रपटाच्या यशानंतर, अनन्या पांडे नुकतीच एअरपोर्टवर दिसली होती, ज्यामुळे ती तिचा वाढदिवस तिचा कथित बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसोबत साजरा करणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे. पार्टीचे इनसाइड फोटोज आता समोर आले आहेत, ज्यामध्ये तिचे अनेक मित्रमंडळी या पार्टीत उपस्थित होती. सध्या अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं जात आहे. मात्र तुम्हाला माहितीये का याआधी अभिनेत्रीचं नाव शाहरुखचा लेक आर्यन खानसोबतही जोडलं जात होतं.

अनेकदा आर्यन आणि अनन्या एकत्र स्पॉटही झाले आहेत. त्यामुळेच यांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा होत होती. काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. व्हायरल झालेल्या या फोटोत अनन्या आणि आर्यन असल्याचं युजर्सचं म्हणणं होतं. व्हायरल होणाऱ्या या फोटोत हे सेलिब्रिटी कपल लिपलॉक करताना दिसत आहेत. पण अभिनेत्रीने चतुराईने आपला चेहरा फोनवरून लपवला आहे. अभिनेत्रीने चतुराईने आपला चेहरा फोनने लपवला आहे. त्यामुळे हा फोटो पाहिल्यानंतर अनेक लोक म्हणत आहेत की हा फोटो अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा आहे.

अनेकांनी या फोटोवर कमेंट करत लिहीलंय की, या फोटोत दिसणारं कपल आर्यन आणि अनन्या आहे. तर  एकाने लिहीलंय, शाहरुख का लडका और कोई लडकी, तर अजून एकाने लिहीलंय मलायका और अर्जून, तर अजून एकाने लिहीलंय, मिरा राजपूत आणि शाहिद कपूर तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की, अनन्या आणि आर्यन खान. याचबरोबर पिंकविलाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला होता. हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीण्यात आलं आहे की, कोण आहे ओळखा? हा फोटो जरी आता चर्चेत असला तरी हा फोटो जुना आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोत कोणते सेलिब्रिटी कपल आहे हे ओळखणं कठीण आहे. हा फोटो समोर आल्यानंतर यूजर्स म्हणत आहेत की या फोटोत आर्यन आणि अनन्या आहेत. सगळ्यांना माहित आहे की स्टारकिड्स सुहाना खान, शनाया कपूर आणि अनन्या पांडे हे बेस्ट फ्रेंड आहेत. तर सध्या अभिनेत्री आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याचंही म्हटलं जात आहे.