भांडण की प्रमोशन फंडा? Falguni Pathak - Neha Kakkar चा नवा व्हिडिओ समोर येताच चाहते हैराण

नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक सध्या एकमेकांवर शब्दांत हल्ला करत आहेत. 

Updated: Sep 26, 2022, 02:02 PM IST
भांडण की प्रमोशन फंडा? Falguni Pathak - Neha Kakkar चा नवा व्हिडिओ समोर येताच चाहते हैराण title=

मुंबई : बॉलीवूड गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सोबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 13' (Indian Idol 13) च्या सेटवर पोहोचली, ज्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले. नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक सध्या एकमेकांवर शाब्दिक हल्ला करत आहेत. फाल्गुनी पाठकच्या 'मैने पायल है छनकाई' (Maine Payal Hai Chhankai) या सुपरहिट गाण्याचं रिमिक्स बनवल्यानंतर नेहा कक्कर आणि तिच्यामध्ये खूप वाद झाले. दरम्यान, फाल्गुनी नेहा कक्करच्या रिएलिटी शोमध्ये दिसली होती.

फाल्गुनी पाठक इंडियन आयडॉल 13 मध्ये पोहोचली
वास्तविक, फाल्गुनी पाठक 'इंडियन आयडॉल 13' मध्ये नवरात्री  स्पेशल एपिसोडमध्ये दिसणार आहे.  थिएटर राउंड दरम्यान गरबा नाईटचा भाग असेल. वाहिनीने त्याचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नेहा कक्कर गायिका फाल्गुनी पाठकचं स्वागत करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नेहाने गायिका फाल्गुनीला 'लिजंडरी' म्हटलं आहे. नेहा म्हणली की, थिएटर राऊंड सुरू होणार आहे.

अशा परिस्थितीत माता रानीचं नाव घेण्यापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही. ती म्हणाली, "लेजेंडरी फाल्गुनी मॅडम आमच्यामध्ये आल्या आहेत." यानंतर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. नंतर फाल्गुनीने गरबा गाणंही गायलं.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक यांच्यातील ऑनलाइन वॉरच्या दरम्यान, लोकांना तिचे रिअॅलिटी शोमध्ये येणं आवडलं नाही आणि तेही नेहा ज्या शोमध्ये जज आहे. सोशल मीडियावर यूजर्स त्यांच्या भांडणाला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'मैंने पायल है छनकाई'च्या रिमिक्सवरून भांडण
फाल्गुनी पाठकने 90 च्या दशकात 'मैने पायल है छनकाई' हे गाणं गायलं होतं. जे सुपरहिट ठरलं. अलीकडेच नेहा कक्करने याचं रिमिक्स बनवलं होतं. जे लोकांना फारसं आवडलं नाही. अगदी, फाल्गुनीने त्याच्या रिमिक्सवर नाराजी व्यक्त केली. तिला आधी माहीत असतं तर कायदेशीर कारवाई केली असती, असंही तिने सांगितलं. मात्र, ती हे करू शकत नाही. नेहाने आपल्या गाण्याचं रिमिक्स बनवलं असल्याची खंत तिने व्यक्त केली. त्याचबरोबर नेहा कक्कर सोशल मीडियावर तिच्या गाण्याचं जोरदार प्रमोशन करत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x