प्रसिद्ध मराठी कॉमेडी अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककाळा

मनोरंजन सृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याचं निधन झालं आहे. 

Updated: Mar 27, 2024, 01:34 PM IST
प्रसिद्ध मराठी कॉमेडी अभिनेत्याचं निधन; मनोरंजन सृष्टीवर शोककाळा title=

मुंबई : असे अनेक कलाकार असतात जे सिनेसृष्टीत येतात आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. यातलाच एक अभिनेता म्हणजे मालवणी नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा लोकप्रिय ज्येष्ठ मालवणी अभिनेते लवराज कांबळी. नुकतंच या अभिनेत्याचं निधन झालं आहे. त्याची ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मालवणी नटसम्राट म्हणून हा अभिनेता लोकप्रिय होता. लवराज कांबळी यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आहे. मच्छिन्द्र कांबळी यांच्या 'वस्त्रहरण' या नाटकातील भोप्याची भूमिका  खूपच गाजली होती. अभिनेत्याचं मुंबईत निधन झालं आहे. 

अभिनेत्याच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांचं निवासस्थान मालवण मधील रेवंडी गाव आहे. आत्तापर्यंत अभिनयासोबतच ते नाट्यनिर्मातेदेखील होते. त्यांनी अनेक मालवणी नाटकांची निर्मिती केली होती. वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील मुलुंड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालवणी नाटक घराघरात पोहोचवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या अंतिम संस्कारावेळी प्रसाद कांबळींसह नाट्यसृष्टीतील उपस्थित होती. 

लव यांच्यासोबत अंकुश यांनी अनेक मालवणी नाटकात त्यांनी काम केलं. याजोडीने ८०- ९० च्या दशकात गिरणगावात त्यांच्या कलेच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. ही जोडी खूपच लोकप्रिय होती. प्रेक्षकवर्गाकडून त्यांच्यावर श्रद्धांजली वाहत आहेत तर त्यांच्या जाण्याने मालवणी नाट्यसृष्टीचं नुकसान झालं असल्याची भावना जनमानसात आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आणि सून असा परिवार आहे. अगदी साधं राहणीमान आणि शांत स्वभाव असं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. 

भद्रकाली प्रॉडक्शनच्या 'पांडगो इलो बा इलो', 'केला तुका', 'घास रे रामा'  नाटकांमध्ये काम केलं होतं. तर २५०० त्यांनी गोप्या साकारला. त्यांच्या नाटकाचा चाहता वर्ग खूप मोठा होता. आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या अभिनयातून अनेकांना हसवलं. याचबरोबर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या 'सेम टू सेम' या चित्रपटातही काम केलं होतं.