Krishna Kumar Kunnath Death | 'ऐसा क्या गुनाह किया जो लूट गए' गाणाऱ्या केकेचं निधन

प्रसिद्ध गायक केके उर्फ ​​कृष्ण कुमार कुननाथ याच (Krishna Kumar Kunnath Death) निधन झालं आहे. 

Updated: Jun 1, 2022, 12:07 AM IST
Krishna Kumar Kunnath Death | 'ऐसा क्या गुनाह किया जो लूट गए' गाणाऱ्या केकेचं निधन title=

कोलकाता :  कला विश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक केके उर्फ ​​कृष्ण कुमार कुननाथ याच (krishna kumar kunnath passes away) निधन झालं आहे. तो कोलकात्यात एका कॉन्सर्टसाठी गेला होता. पण कॉन्सर्ट संपल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि तो कोसळले. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वयाच्या ५३ व्या वर्षी केकेने जगाचा निरोप घेतला. (famous singer kk aka krishna kumar kunnath passes away)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. मात्र सध्या डॉक्टरांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

केके हा बॉलीवूडचा टॉप-क्लास गायक होता ज्याने अनेक भाषांमध्ये गाणी गायली. ज्यांच्या मधुर आवाजाने नेहमीच सर्वांच्या हृदयावर राज्य केले होते. 90 च्या दशकात केकेने रोमँटिक, मैत्री आणि प्रेमावर आधारित अनेक गाणी गायली होती आणि ती गाजलीही होती.  मात्र आता त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.