'तू फार वाईट दिसतेयस'; चाहत्याच्या या प्रतिक्रियेवर अभिनेत्री म्हणते....

पाहा ही अभिनेत्री आहे तरी कोण   

Updated: Aug 18, 2020, 10:12 AM IST
'तू फार वाईट दिसतेयस'; चाहत्याच्या या प्रतिक्रियेवर अभिनेत्री म्हणते....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर सहसा कलाकार मंडळी त्यांचे अनेक फोटो, व्हि़डिओ पोस्ट करुन चाहत्यांशी जणू एक प्रकारचं नातं प्रस्थापित करु पाहतात. हे नातं अनेकदा इतकं हक्काचं होतं, की अमुक एका सेलिब्रिटीच्या पोस्ट पाहणं हा सवयीचा भाग होऊन जातो. सेलिब्रिटी मंडळींना सोशल मीडियावर ज्याप्रमाणं चाहत्यांचं प्रेम मिळतं, त्याचप्रमाणं त्यांच्या टीकेलाही सामोरं जावं लागतं. सध्या अशाच एका अभिनेत्रीला चाहत्याच्या थेट प्रतिक्रियेचा सामना करावा लागला आहे. 

सहसा चाहत्यांच्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत असतात. पण, यावेळी मात्र या अभिनेत्रीनं त्यावर दिलेलं उत्तरही तितकंच लक्ष वेधून जात आहे. अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिनं तिची नवी हेइरस्टाईल दाखवणारा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.  “I don’t need wings to fly. My unfurnished head is enough,” असं कॅप्शनी तिनं या पोस्टला दिलं. ज्यावर तिच्या या हेअरस्टाईलला चाहत्यांची पसंती मिळाली. पण, स्वस्तिकाला यातही टीकेचं धनी व्हावं लागलं. 

'तुझी हेअरस्टाईल मला आवडली आहे. पण, ठाऊक नाही का, पण तू फारच वाईट दिसत आहेस. बहुतेक मेकअप किंवा नो फिल्टर लूकमुळं असावं', अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली. त्याच्या या प्रामाणिक प्रतिक्रियेवर उत्तर देत स्वस्तिकानं लिहिलं, 'Bad is in... वाईट दिसण्यालाही चिअर्स.... '. 

आपल्यावर होणाऱ्या टीकेलाही उत्तर देताना स्वस्तिकाचा हा सकारात्मक अंदाज इतर चाहत्यांची मनं जिंकून गेला. याचाच प्रत्यय आला तिच्यावर होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावातून. स्वस्तिकाचा हा नवा लूक पाहून, या हटके लूकची अनेकांनीच प्रशंसाही केली. त्यामुळं सोशल मीडियावर काही काळासाठी या विषयाची बरीच चर्चा पाहायला मिळाली. 

 

दरम्यान, स्वस्तिकाच्या कामाविषयी सांगावं तर, मुकेश छाबराच्या 'दिल बेचारा', या चित्रपटातून ती झळकली होती. सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघी यांच्यासोबत तिनं स्क्रीन शेअर केली होती. याआधी तिनं 'पाताल लोक', या वेस सीरिजमध्ये 'डॉली मेहरा' ही व्यक्तीरेखा साकारली होती.