'तिचा स्कर्ट उडाला अन् स्पॉट बॉय बेशुद्ध पडला', कोरिओग्राफर म्हणाली, 'ठरल्याप्रमाणे तिने..'

Choreographer On Actress Skirt Flew During Shoot: या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी कशी मिळाली यासंदर्भात माहिती दिल्यानंतर शुटींग दरम्यान घडलेला किस्साही तिने सांगितला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 13, 2024, 02:33 PM IST
'तिचा स्कर्ट उडाला अन् स्पॉट बॉय बेशुद्ध पडला', कोरिओग्राफर म्हणाली, 'ठरल्याप्रमाणे तिने..' title=
एका मुलाखतीत सांगितला किस्सा

Choreographer​ On Actress Skirt Flew During Shoot: हिंदी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या नृत्य दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे फराह खान! फराहने कोरिओग्राफी केलेल्या आणि गाजलेल्या गाण्यांपैकी एक म्हणजे 'जो जिता वही सिकंदर' चित्रपटातील 'पहिला नशा' हे गाणं. फराहने या गाण्यासंदर्भातील एक रंजक किस्सा नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितला. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी कशी मिळाली हे सुद्धा फराहने सांगितलं. हे गाणं आधी ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान दिग्दर्शित करणार होत्या. मात्र अचानक फराहला सांधी मिळाली. या गाण्यामधील मार्लिन मन्रोसारखी पोज देण्याची कल्पना आपलीच होती, असंही फराहने सांगितलं आहे. अभिनेत्री पूजा बेदीने दिलेली ही पोज पाहून सेटवर स्पॉट बॉय बेशुद्ध पडला होता, असं फराहने सांगितलं. ठरल्याप्रमाणे पूजाने तिचा स्कर्ट खालीच केला नाही आणि समोरचं दृष्य पाहून स्पॉट बॉय बेशुद्ध पडलेला असं फरहाने मुलाखतीत सांगितलं.

फराहला कोरिओग्राफीची संधी कशी मिळाली?

'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये फराहने या गाण्यामध्ये संधी कशी मिळाली हे सांगितलं. "हे गाणं सरोजजी करणार होत्या हे सर्वांना ठाऊक होतं. मात्र काहीतरी झालं आणि त्यांना अचानक मुंबईला यावं लागालं. त्या श्रीदेवी किंवा माधुरी दिक्षितबरोबरच्या शूटसाठी आल्या होत्या. असं असताना आम्ही उटीला होतो. त्या गेल्या आणि परत आल्याच नाहीत," असं फराहने सांगितलं. ज्यावेळेस आपल्याला या गाण्यासंदर्भात विचारण्यात आलं तेव्हा आपल्याकडे अवघ्या काही कार्यक्रमांच्या कोरिओग्राफीचा अनुभव होता. "मला दिग्दर्शक मन्सूर खान यांनी कॉल केला आणि 'पहिला नशा'ची कोरिओग्राफी करण्यास सांगितलं. शुटींग थांबल्याने त्यांना मोठं आर्थिक नुकसान होतं असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला," असं फराह म्हणाली.

एका दिवसाचा वेळ मागितला

फराह यांना ही ऑफर देण्यात आल्यानंतर त्यांनी दिग्दर्शकांकडून एका दिवसाचा वेळ मागितला. या कालावधीत फराहने गाण्यातील स्टेप्सवर काम केलं. या गाण्यातील डान्समधून अभिनेत्री स्वप्नात असल्याचं मला दाखवायचं होतं. त्यामुळेच आपण मार्लिन मन्रोची पोज पूजाला करायला लावण्याचं ठरवलं. पूजा कारवर उभी राहणार होती आणि खालून फॅनच्या मदतीने तिचा स्कर्ट उडवला जाईल, असं ठरवलेलं, अशी माहिती फराहने दिली. मात्र यातही एक मोठा गोंधळ झाला.

...अन् स्पॉट बॉय बेशुद्ध पडला

"पूजाला मार्लिन मन्रोच्या पोजमध्ये शूट करण्याची कल्पना माझीच होती. मी पूजाला सांगितलं की पंखा बंद झाल्यावर तू तुझा स्कर्ट खाली घे. पहिल्या शॉटमध्ये एक स्पॉट बॉय फॅन पकडून उभा होता. फॅन सुरु केल्यानंतर ठरल्याप्रमाणे पूजाने तिचा स्कर्ट खाली पकडून धरण्याचा प्रयत्न केला नाही. हा सारा प्रकार पाहून फॅन धरुन उभा असलेला स्पॉट बॉय बेशुद्ध पडला. त्यावेळेस मी पहिल्यांदा थाँग (अंतरवस्राचा एक प्रकार) काय असते ते पाहिलं. पूजा अगदी बिनधास्त होती. तिला कसलीच चिंता वाटत नव्हती," असं फराहने हसत सांगितलं. 'जो जिता वही सिकंदर' चित्रपटामध्ये आमिर खान, आयशा झुलका आणि दिपक तिजोरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.