फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचं अंडरवॉटर किस, चाहते म्हणाले, "जिंदगी..."

फेब्रुवारी महिन्यात शिबानी दांडेकरसोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर मालदीवला गेला आहे.

Updated: Jun 16, 2022, 05:49 PM IST
फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचं अंडरवॉटर किस, चाहते म्हणाले, "जिंदगी..." title=

मुंबई: फेब्रुवारी महिन्यात शिबानी दांडेकरसोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर मालदीवला गेला आहे. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या वर्षी १९ फेब्रुवारीला विवाहबद्ध झाले आहेत. अभिनेता फरहान अख्तर याने मालदीव टूरमधील आनंदाचे क्षण सोशल मीडिया अकाऊंटवर एका व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत. दोघेही मालदीवमध्ये आनंदात असल्याचं दिसत आहे. दोघांनी समुद्राखाली स्कूबाडायव्हिंगचा आनंद लुटला. एवढेच नाही तर दोघेही डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'ची आठवण झाली.

अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो पत्नी शिबानीसोबत बीचवर डान्स करताना दिसत आहे आणि नंतर स्कूबा डायव्हिंगसाठी जातो. यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि किस करतात. दोघांचे रोमँटिक क्षण पाहून चाहत्यांनी आपल्या अंदाजात कमेंट्स केल्या आहेत.

काही तासांतच त्याच्या या व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं आहे की, 'भाऊ, जिंदगी ना मिलेगी दोबारा व्हायब्स जगत आहेस', तर दुसऱ्याने लिहिले, 'OMG! डान्स आणि पाण्याखालील मिठी भारीच'.