मुंबई : 'मर्सल' या चित्रपटातील काही आक्षेपार्ह सीन्समुळे गेले काही दिवस वाद सुरू आहेत.
वादाच्या भोवर्यात अडकलेल्या 'मर्सल' चित्रपटाला भाजपाने निषेध केला आहे. त्यावरून काही न्यूज चॅनेल्सवर चर्चा रंगत आहेत.
एका चर्चेदरम्यान भाजपाचे प्रवक्ता जेवीएल नरसिंह राव यांनी चर्चेमध्ये सहभाग घेताना कलाकारांवर टीका केली. यावेळेस ' कलाकारांची बौद्धिक पातळी कमी असते. तसेच त्यांचे सामान्यज्ञानदेखील कमी असते.' अशा शब्दांत कलाकारावर टीका केल्याने अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर भडकला आहे.
How dare you, sir?? @GVLNRAO
And to all film people in his ranks.. here’s what he thinks of you. #shame https://t.co/6C8v6hZa23
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) October 22, 2017
फरहान अख्तरने नरसिंह राव यांना ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ट्विट करताना फरहान अख्तरने 'तुमची हिंमत कशी झाली सर...' असा प्रश्न विचारत त्यांचा धिक्कार केला करत असल्याचे ट्विट केले आहे.
तमिल सुपरस्टार विजय 'मर्सल' चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये नोटाबंदी आणि जीएसटी नकारात्मक स्वरूपात दाखवले असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हाणणे आहे. त्यामुळे 'मर्सल' चित्रपटातून संबंधित दृश्य काढून टाकण्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे.
भाजपा कार्यकर्त्यांकडून चित्रपटाचा निषेध होत असला तरीही राहुल गांधी समवेत अनेक कलाकार 'मर्सल' चित्रपटाच्या पाठीशी उभे आहेत.
कमल हसन यांनी 'चित्रपट पुन्हा सेन्सॉर करू नये.' असे ठाम मत ट्विटरवर मांडले आहे.
साऊथ सुपरस्टार रजनीकांतदेखील 'मर्सल'च्या पाठीशी उभे आहेत. ' या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. 'मर्सल' टीमचे अभिनंदन अशा शब्दांत कौतुक केले आहे.
'मर्सल' चित्रपटाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असला तरीही वाढता दबाव पाहता निर्मात्यांनी माफीनामादेखील सादर केला आहे.