close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शुटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी

फोटो शेअर करून चाहत्यांना दिली माहिती 

Updated: Oct 14, 2019, 09:38 AM IST
शुटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याच्या 'तूफान' या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. पण या शुटिंगदरम्यान फरहान जखमी झाला आहे. फरहानच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्टर झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा करत आहेत. या सिनेमात फरहान बॉक्सरची भूमिका साकारली आहे.

फरहानने आपल्या हाताचा एक्स-रे रिपोर्ट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ही माझी पहिली बॉक्सिंग इंजरी (दुखापत) आहे. माझ्या हेमेट (तळव्याजवळचा एक भाग) मध्ये हेअरलाइन फ्रॅक्चर झालं आहे. फरहान अख्तर सहा वर्षानंतर मेहरासोबत काम केलं आहे. या अगोदर दोघांनी एथलीट मिल्खा सिंह यांच्यावर बायोपिक 'भाग मिल्खा भाग' सिनेमा बनवला होता. (हे पण वाचा - बॉक्स ऑफिसवर 'The Sky Is Pink'सिनेमाची एवढी कमाई?)

11 ऑक्टोबर रोजी फरहान अख्तरचा 'द स्काय इज पिंक' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यासिनेमात फरहानसोबत प्रियांका चोप्रा, झायरा वसीम आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहेत. फरहानने 'द स्काय इज पिंक' हा सिनेमा मोटीवेशनल स्पीकर आएशा चौधरीवर आधारित आहे. आएशा पल्मनरी फायबरोसिस (Pulmonary Fibrosis) या आजाराने ग्रासलेली होती. प्रियांका आणि फरहान आएशाच्या पालकांची भूमिका साकारत आहेत. तर झायरा आएशाची भूमिका साकारत आहे.