Fatima Sana Shaikh Health Update: आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आजाराबाबत चाहत्यांना सांगितलं आणि जागरुतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आता 'दंगल' सिनेमातील अभिनेत्री फातिमा सना शेखने (Fatima Sana Shaikh) देखील तिच्या आजाराचा खुलासा सोशल मीडियाच्या (Fatima Sana Shaikh Instagram) माध्यमातून केला आहे. फातिमा सना शेख epilepsy या गंभीर आजाराचा सामना करत आहे.
epilepsy आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढावी , या कारणामुळे फातिमाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना आजाराबद्दल माहिती दिली आहे. सध्या तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर अभिनेत्री आजाराबाबत चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली आहेत. (Fatima Sana Shaikh Health Update)
फातिमा सना शेख epilepsy बाबत म्हणाली
सोशल मीडियावर एका चाहत्याने फातिमा सना शेख एक प्रश्न विचारला, तू epilepsy चा सामना कसा करते? यावर अभिनेत्री म्हणाली, 'माझ्याकडे सपोर्ट सिस्टम आहे. ज्यामध्ये कुटुंब, मित्र आणि माझा पेट देखील सामिल आहे...' या आजाराचा सामना करत असताना काही दिवस चांगले असतात, तर काही दिवस वाईट असतात... असं देखील अभिनेत्री म्हणाली.
फातिमा सना शेखला अभिनेता आमिर खान स्टारर 'दंगल' सिनेमाच्या सेटवर एपिलेप्सीची माहिती मिळाली असल्याचं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. 'दंगल' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान फातिमाला epilepsy चा झटका आला होता.
epilepsy चा झटका आल्यानंतर फातिमाला (fatima sana shaikh boyfriend) तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबद्दल अभिनेत्री म्हणली, 'पहिले पाच वर्ष मी आजाराबाबत सत्य नाकारत होती. पण आता मी आजारासोहब राहायला, काम करायला आणि जगायला शिकले आहे.' असं देखील अभिनेत्री म्हणाली.