'लुका छुपी' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

सिनेमामध्ये कार्तिक आर्यन स्थानिक वृत्तवाहिनी मधील एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे

Updated: Jan 23, 2019, 04:59 PM IST
'लुका छुपी' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित title=

मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. लुका छुपी सिनेमात कार्तिक आर्यन सोबत क्रिती सेनन झळकणार आहे. सिनेमा एका पत्रकाराच्या आयुष्यावर बेतलेला आहे. सिनेमाची गोष्ट मथुरा, ग्वालियर आणि आग्रा या भागातील आहे. आज सिनेमाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आणि २४ जानेवारी रोजी सिनेमाचा ट्रेलर प्रकाशित करण्यात येणार आहे. १ मार्च २०१९ रोजी 'लुका छुपी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Pakde jayenge ya denge sabko chakma? Presenting the first poster of LukaChuppi Trailer Out Tomorrow kritisanon #DineshVijan MaddockFilms PVijan sharadakarki laxman.utekar PankajTripathi aparshakti_khurana #VinayPathak tseries.official officialjiocinema

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कार्तिक आर्यनने सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करत, 'पकड़े जाएंगे या देंगे सबको चखमा?' असे कॅप्शन शेअर केलेल्या पोस्टरला दिले. कार्तिकच्या वाढदिवसाला क्रिती सेननने एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सिनेमामध्ये कार्तिक आर्यन स्थानिक वृत्तवाहिनीमधील एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे आणि क्रिती ही कार्तिकच्या प्रेयसीच्या रुपात दिसणार असून, या सिनेमात स्थानिक भाषेला प्राधान्य देण्यात आले आहे. 

 

 

 

 

सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण यांनी केले आहे. त्यांच्या मते, 'कार्तिक आणि क्रिती सेनन यांची विनोदबुद्धी फार कमालीची आहे आणि मला माहीत आहे. सिनेमा शूटिंगवेळी सर्वांनीच फार धम्माल केली असणार'. 'लुका-छुपी'  सिनेमाच्या माध्यमातून कार्तिक आणि क्रिती पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. कार्तिक आर्यन-क्रिती सनॉन यांचा सिनेमा 'लुका छुपी' आणि सुशांत सिंह राजपूत-भूमी पेडणेकर यांचा सिनेमा 'सोनचिड़िया' १ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या दोन सिनेमांमध्ये कमालीची टक्कर बघायला मिळणार आहे.