'मनमर्जियां' सिनेमाचा मजेशीर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

दीर्घ काळानंतर अभिषेक बच्चन रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. 

Updated: Aug 9, 2018, 12:04 PM IST
'मनमर्जियां' सिनेमाचा मजेशीर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : दीर्घ काळानंतर अभिषेक बच्चन रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. 'मनमर्जियां' या सिनेमातून अभिषेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये विक्की कौशल, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन मजेदार अंदाजात दिसत आहेत. पण यातील विक्की कौशलचा अंदाज जरा हटकेच आहे.

या सिनेमात तापसी पन्नूने रुमी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर विक्की कौशलच्या भूमिकेचे नाव विक्की आहे. हे दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करत असतात. पण विक्की काहीसा आरामात काम करणारा, आळशी माणूस. त्याच्या या स्वभावाला चिडून रुमी त्याला एक अलिमेटम देते. पण तो तेही पूर्ण करत नाही. तिथे अभिषेकची एंट्री होते आणि तापसी-अभिषेकचा विवाह होतो. पण मग पुढे काय होते? हा लव्ह ट्रॅंगल नक्की काय सांगतो, हे जाणून घेण्यासाठी सिनेमाची वाट पाहावी लागेल. तोपर्यंत पाहा हा धमाकेदार ट्रेलर...

या सिनेमाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे. तर याची निर्मिती आनंद एल राय यांनी केली आहे. मुक्काबाज नंतर आनंद एल राय आणि अनुरागचा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी सिनेमाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी करणार होती. तर आयुष्यमान खुराना आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार होते. पण अचानक गणित बदलली आणि अनुराग कश्यपचा हातात दिग्दर्शनाची सुत्रं आली.