मुंबई : भारतीय सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणारे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही शांताराम यांची आज 116वी जयंती. त्यामुळे आजच्या (शनिवार,18 नोव्हेंबर) दिवसाचे महत्त्व ओळखून इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्ज इंजिन असलेल्या गुगलने डूडल बनवून व्ही शांताराम यांना आदरांजली वाहीली आहे.
व्ही. शांताराम यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 मध्ये कोल्हापूरात झाला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या व्ही शांताराम यांनी शिक्षण मध्यातूनच सोडले. मात्र, लहानपनापासूनच चित्रपट क्षेत्रात त्यांना आवड होती. त्यामुळे त्यांनी तरूणपणी चित्रपट क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. वयाच्या 19व्या वर्षी ते बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीशी जोडले गेले.
महाराष्ट्र फिल्म कंपनीत त्यांनी चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकले. 1921मध्ये शांताराम यांनी मुकचित्रपट 'सुरेख हरण'मध्ये अभिनेता म्हणून काम केले. 1929 मध्ये त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली. या कंपनीचे नाव होते प्रभात फिल्म.
प्रभआत फिल्मने आपल्या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मीती केली. यात 'गोपाल कृष्णा', 'खूनी खंजर', 'रानी साहिबा' आणि 'उदयकाल' यांसारख्या चित्रपटांचाही समावेश आहे. शांताराम यांची चित्रपट कारकीर्द साधारण 60 वर्षांची राहिली. आपल्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे 50 दर्जेदार चित्रपटांची निर्मीती केली. अशा या हरहुन्नही व्यक्तीमत्त्वाने 30 ऑक्टोबर 1990मध्ये जगाचा निरोप गेतला. त्यांच्या कार्याला झी 24 तासचा सलाम...