कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ सिनेमाची पहिली झलक (व्हिडिओ)

कॉमेडियन कपिल शर्मा याच्या बहुचर्चीत ‘फिरंगी’ या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कपिलचा हा दुसरा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकताही आहे. 

Updated: Oct 13, 2017, 02:21 PM IST
कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ सिनेमाची पहिली झलक (व्हिडिओ) title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा याच्या बहुचर्चीत ‘फिरंगी’ या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कपिलचा हा दुसरा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकताही आहे. 

राजीव ढिंगरा दिग्दर्शित या सिनेमा कपिलसोबतच ईशिता दत्ता आणि मोनिका गिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. काही रिपोर्टनुसार, कपिलने या सिनेमात गाणंही गायलं आहे. 

‘फिरंगी’ या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये कपिल वेगळ्याच अंदाजात बघायला मिळतो आहे. याआधी कपिलने ‘किस किस को प्यार करू’ या सिनेमात मुख्य भूमिका केली होती. दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी त्याला लॉन्च केले होते.