'रेस ३' मध्ये बॉबी देओलची एन्ट्री

रेस ३ या सिनेमाचे निर्माते रमेश तौराणी यांनी व्टिट करुन ही माहिती दिली. त्यामुळे बॉबी देओलसाठी हा खुप मोठा ब्रेक असल्याचे बोलले जात आहे

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 13, 2017, 10:57 AM IST
 'रेस ३' मध्ये बॉबी देओलची एन्ट्री title=

मुंबई : रेस ३ मध्ये सलमान खान बरोबर इम्रान हाश्मी झळकणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत होती.पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून हा रोल अखेर बॉबी देओलने पटकावला आहे.

बॉबी देओल बराच काळ चांगल्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर आला नव्हता. त्यानंतर या सिनेमात एन्ट्री झाल्याने बॉबीचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. रेस ३ या सिनेमाचे निर्माते रमेश तौराणी यांनी व्टिट करुन ही माहिती दिली. त्यामुळे बॉबी देओलसाठी हा खूप मोठा ब्रेक असल्याचे बोलले जात आहे
कारण ब-याच वर्षांपासून बॉबीकडे एकही सिनेमा नव्हता.तसेच नुकताच आलेल्या त्याच्या पोश्टर बॉईज या सिनेमानेही निराशा केली होती.त्यामुळे आता सलमान खान बरोबरचा हा सिनेमा बॉबीचं करिअर तारतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.