पहिल्या आठवड्यामध्ये 'तुम्हारी सुलू'ची कमाई किती ?

  अभिनेत्री विदया बालन आणि आर जे हे समीकरण पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आले आहे.

Updated: Nov 18, 2017, 03:49 PM IST
पहिल्या आठवड्यामध्ये 'तुम्हारी सुलू'ची कमाई किती ?  title=

मुंबई :  अभिनेत्री विदया बालन आणि आर जे हे समीकरण पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आले आहे.

'तुम्हारी सुलू' या चित्रपटाच्या माध्यमातून विद्या बालन रसिकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटामध्ये विद्या एक आर जेची भूमिका साकारत आहे. तसेच तिचा शो नाईट शो आहे.  हा खूप प्रसिद्ध होतो.  

 

शुक्रवारी थोडी रखडतच या चित्रपटाची सुरवात झाली. मात्र संध्याकाळी कमाईमध्ये थोडी वाढ झाली. या चित्रपटामध्ये नेहा धुपिया, आर जे मलिश्कादेखील झळकली आहे.  

कमाई किती ? 

पहिल्या दिवशी या चित्रपटाने सुमारे २.८७ कोटींची कमाई करण्यात  यशस्वी ठरला आहे. अशी माहिती ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे.  

'बेगम जान' पाठोपाठ आलेला विद्या  बालनचा हा चित्रपट यंदाचा दुसरा चित्रपट आहे. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर फार दमदार कमाई करू शकलेले नाहीत.