मुंबई : अभिनेता रितेश देशमुख अत्यंत शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. असे फार कमी लोक असतील ज्यांनी रितेशला कधी रागात पाहील असेल. जेव्हाही रितेशला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात तेव्हा देखील तो ट्रोलरला विनोदी अंदाजात उत्तर देतो. कोणत्याही ट्रोलचा त्याला काही फरक पडत नाही. अशा अनेक नकारात्मक कमेन्टवर रितेश दुर्लक्ष करतो आणि त्याला जे आवडतं तेच तो करत. आता देखील अभिनेता अरबाज खानच्या 'पिंच'शोमध्ये रितेश आणि अभिनेत्री जेनेलियाने ट्रोलर्सच्या कमेन्टवर सडेतोड उत्तर दिलं आहे.
एका ट्रोलरने रितेशसाठी लिहिलं की, 'तुझ्या पत्नीवर अधिक लक्ष केंद्रीत कर...' या ट्रोलरला विनोदी बुद्धीने उत्तर देत रितेश म्हणाला, 'मला देखील असचं वाटत आहे, माझ्या पत्नीवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा स्वतःच्या पत्नीवर लक्ष केंद्रीत कर...' एवढंच नाही तर अरबाजने शोच्या प्रोमोमध्ये जेनेलियासमोर काही कमेन्ट वाचून दाखवले.
'बेशर्म, चीप, वल्गर आन्टी... नेहमी ओव्हरऍक्टींग करत असते. तुझ्या वयाला आणि चेहऱ्याला या गोष्टी आता ठिक वाटत नाहीत. दोन मुलांची आई आहेस. तुझी ही ओव्हरऍक्टींग पाहून ते देखील थक्क होवून जातील....' ट्रोलरच्या या कमेन्टला उत्तर देत रागात जेनेलिया म्हणाली, 'मला नाही वाटत घरी तुमचे दिवस चांगले असतील...'
सध्या 'पिंच' शोमधील रितेश-जेनेलियाचा हा भाग सध्या तुफान व्हायरल होत आहे. रितेश आणि जेनेलिया बॉलिवूडचं क्यूट कपल आहे. 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. 10 वर्ष डेट केल्यानंतर 2012 साली दोघांनी लग्न केलं. आता त्यांना दोन मुलं आहे. त्यांच्या दोन मुलांची नावं राह्यल आणि रिआन असं आहे.