'छिछोरे'ने जिंकले परदेशातील चाहत्यांचे मन

सलग चौथ्या दिवशी 'छिछोरे' चित्रपटाची दमदार कमाई  

Updated: Sep 10, 2019, 03:12 PM IST
'छिछोरे'ने जिंकले परदेशातील चाहत्यांचे मन title=

मुंबई : प्रत्येकाला त्याच्या कॉलेजच्या दिवसांची, कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये केलेल्या मजा-मस्तीची आठवण करून देणारा 'छिछोरे' चित्रपट सलग चढत्या क्रमावर आहे. कॉलेजच्या आठवणींमध्ये रमण्यास भाग पाडणारा हा चित्रपट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर सलग पाचव्या दिवशी चित्रपटाने भारतीय बाजारात ४४.०८ कोटी रूपयांचा गल्ला जमा करत ५० कोटींच्या घरात एन्ट्री मारण्याची तयारी केली आहे. 

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांची भारत आणि परदेशातील चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. प्रदर्शित होताच चित्रपटाने ७.३२ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला, तर शनिवारी १२.२५, रविवारी १६.४१ आणि सोमवारी चित्रपटाने ८.१० कोटी रूपयांपर्यंत मजल मारली आहे. 

तर परदेशात देखील 'छिछोरे' चित्रपट चाहत्यांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चित्रपटाने १०.३९ कोटी रूपयांचा आकडा पार केला आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या कथेचे आणि कलाकारांचे कौतुक होताना दिसत आहे. एकदंर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चित्रपटाचं शूटिंग एका इंजिनियरिंगच्या कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे. सुशांत, श्रद्धाने प्रमुख भूमिका साकारली असून प्रतीक बब्बर सुशांतच्या मित्राची भूमिका साकारत आहे. 'छिछोरे'चं दिग्दर्शन 'दंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडियोज आणि साजिद नाडियावाला यांनी केली आहे.