लग्नाआधीच अभिनेत्री होणार आई, या फोटोग्राफरशी केलाय साखरपुडा

मुलाच्या आगमनापूर्वी तिने तिच्या घराचं नूतनीकरणही केलं आहे.

Updated: Oct 18, 2021, 09:43 PM IST
लग्नाआधीच अभिनेत्री होणार आई, या फोटोग्राफरशी केलाय साखरपुडा

मुंबई : आपल्या चमकदार अभिनयाने अल्पावधीतच जगभरात आपला ठसा उमटवणाऱ्या फ्रीडा पिंटोचा आज वाढदिवस आहे. फ्रीडा पिंटोने 'स्लमडॉग मिलियनेअर' मध्ये लतिकाची भूमिका साकारली होती आणि तिच्या अभिनयाचं जगभरात कौतुक झालं. या चित्रपटामुळे ती देव पटेलसोबत एक रिअल लाईफ कपल बनली. पण, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. देव पटेलसोबतच्या ब्रेकअपनंतर फ्रीडा पिंटोने रोहन अंतोशी लग्न  करणार आहे मात्र लग्नाआधीच ती आई होणार आहे.

अलीकडेच, फ्रीडा पिंटोने तिच्या बेबी शॉवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, फ्रीडा पिंटो एका सुंदर पांढऱ्या गाऊनमध्ये तिच्या बेबी बंपला फ्लॉन्ट करत आहे. फ्रिडाची हे फोटो खूप पसंत केले जात आहेत. फ्रिडा तिचा होणारा नवरा रोहन अंताओ सोबत पोज देत आहे.

पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये फ्रिडाचा लूक पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. फ्रीदाचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहून असं म्हटलं जात आहे की, मुलाच्या आगमनापूर्वी तिने तिच्या घराचं नूतनीकरणही केलं आहे. सुमारे 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फ्रिडा देव पटेलपासून विभक्त झाली. फ्रिडा देवसोबत गंभीर नात्यात होती, ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्याही चर्चा झाल्या.