Natasa की अजून कोणी...; T20 World Cup 2024 Final विजयानंतर Hardik Pandya ने कोणाला केला Video Call?

Hardik Pandya Video Calls Natasa Stankovic Post Match? :  मेन इन ब्लू ने विश्वकप कब्ज केल्यानंतर खेळाडू जल्लोष साजरा करताना दिसून येत होते. विराट, रोहित आणि बुमराहा कुटुंबासह आनंद साजरा करत असताना Hardik Pandya मैदानातून नेमका कोणाला व्हिडीओ कॉल करत होता, याची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 30, 2024, 02:12 PM IST
Natasa की अजून कोणी...; T20 World Cup 2024 Final विजयानंतर Hardik Pandya ने कोणाला केला Video Call? title=
Natasa Stankovic or anyone else Who did Hardik Pandya video call after T20 World Cup 2024 Final win

Hardik Pandya Video Calls Natasa Stankovic Post Match? : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करुन 17 वर्षांचा दुष्काळ मिटवला. 29 जुलै 2024 हा भारतीय संघासोबत प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस ठरला. सूर्यकुमार यादवचा कॅच आणि हार्दिक पांड्याचा बॉलिंग यामुळे भारताला निसटता सामना जिंकून आपणच चॅम्पियन्स हे सिद्ध करता आलं. या विजयानंतर संपूर्ण संघ आनंद साजरा करताना दिसत होते. कोणी नाचत होतं, तर कोणी मैदानात प्रेक्षकांना अभिवादन करुन आनंद व्यक्त करत होते. (Natasa Stankovic or anyone else Who did Hardik Pandya video call after T20 World Cup 2024 Final win)

मैदानातून विराज कोहली व्हिडीओ कॉलवर कुटुंबासोबत बोलत होता. तर रोहित शर्मा मुलगा आणि पत्नीसोबत विजय साजरा करत होता. जसप्रीत बुमराहदेखील मुलासोबत विजय सेलिब्रेट करत होता. मैदानात असलेले कॅमेरे प्रत्येक क्षण टिपत होते. 

अशात विजयचा आनंद हार्दिक पांड्याचा डोळ्यातही दिसून आला. त्याला अश्रू अनावर झाले होते. या विजयाचा आनंदादरम्यान हार्दिकचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्यामध्ये तो मैदानात बसून कोणातरी व्हिडीओ कॉलवर बोलत आहे. हार्दिकने नेमका कोणाला फोन लावला याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येतं आहे. 

इन्स्टाग्राम पोस्ट झाल्यानंतर या फोटो खाली चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येक जण आपला अंदाज व्यक्त करत आहे. कोणी म्हणतंय की हार्दिक आपली पत्नी नताशाशी बोलतोय. तरा काही जण म्हणतात आहे की, तो मुलगा अगस्त्यशी संवाद साधतोय.

तर एका यूजरने विचारलं की, 'हार्दिकने मॅचनंतर कोणाला कॉल केला?' दुसऱ्या युजरनं लिहिलं, 'नताशा?' एका यूजरने लिहिलं की, 'हार्दिक पांड्याची आई यात काही शंका नाही.' एका यूजरने लिहिलं, 'मला वाटते की त्याची आई किंवा कृणाल पांड्या.' त्याचवेळी एका यूजरने लिहिलं की, 'हार्दिक एकदा म्हणाला होता की, प्रत्येक मॅचनंतर तो सर्वात आधी त्याचा भाऊ कृणालला कॉल करतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

झालं असं की,  एका Reddit वापरकर्त्याच्या पोस्टनंतर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेला उधाण आलं. त्यानंतर या दोघांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजही गायब झाल्यात.  पूर्वी नताशा स्टॅनकोविक पंड्या नताशाच्या इंस्टाग्रामवर असायची, पण आता त्यांनी तिचे नाव पूर्णपणे काढून टाकलंय. एवढंच नाही तर या पोस्टमध्ये असंही लिहिलं होतं की, 4 मार्चला नताशाचा वाढदिवस होता तेव्हा हार्दिककडून कुठलही पोस्ट करण्यात आली नव्हती. या दोघांच्या इन्स्टाग्रामवर अगस्त्यासोबतच्या फोटो शिवाय इतर दोघांचे फोटो दिसत नाहीत. या पोस्टनंतर नताशाने लग्नाचे फोटो डिलीट केले अशी बातमीदेखील समोर आली होती. त्या शिवाय आयपीएलच्या वेळी स्टँडमध्ये किंवा टीमबद्दल ती काही पोस्ट करताना दिसली नाही. त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी बिनसलंय अशी चर्चा रंगलीय.