सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची अखेरची आठवण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर पाहून तुमचेही डोळे पाणावतील

सिद्धार्थ शुक्लाने काही दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेतला.

Updated: Oct 18, 2021, 09:00 PM IST
सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची अखेरची आठवण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर पाहून तुमचेही डोळे पाणावतील

मुंबई : सिद्धार्थ शुक्लाने काही दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांचा आवडता अभिनेता आता त्यांच्यात नाहीत हे वास्तव स्वीकारण्यास चाहते अजूनही असमर्थ आहेत. बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्लाची शहनाज गिलशी मैत्री झाली होती. दोघांची केमिस्ट्री अशी होती की त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच एक्साईटेड असायचे.

तुटली सिडनाझची जोडी 
बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि तेव्हापासून दोघं नेहमीच एकमेकांसोबत होते. चाहत्यांनी या दोघांना सिदनाजचा टॅग दिला होता. आणि दोघांनीही लवकरच लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. हे होण्याआधीच सिडने शेहनाजची साथ कायमसाठी सोडली. आता लवकरच दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

दोघांचं शेवटचं गाणं होणार रिलीज 
सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचं शेवटचं गाणं 'अधुरा' लवकरच रिलीज होणार आहे. याचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ज्यात सिद्धार्थ आणि शहनाजची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये सिद्धार्थ शुक्लाचा एक फिकट फोटो दिसत असून तो शहनाज गिलचं नाक खेचत आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.

 

श्रेया घोषालने सांगितली ही गोष्ट 
या गाण्याचं पोस्टर शेअर करतं, श्रेया घोषालने एक सुंदर ओळ लिहिली आहे. 'एक अधूरा गाना, एक अधूरी कहानी'. हे गाणं श्रेया घोषालने गायलं आहे. तिने गाण्याची पोस्टरही शेअर केलं आहे. श्रेयाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'तो एक स्टार होता आणि नेहमीच राहील. लाखो हृदयांचे प्रेम सदैव चमकत राहील. #अधूरा आहे पण तरीही ते पूर्ण होईल..# सिदनाजचं शेवटचं गाणं.'