रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) हमाली काम, बस कंडक्टरची नोकरी ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास

चित्रपट जगात अनेक स्टार्स असले तरी रजनीकांत यांचं स्थान वेगळं आहे.

Updated: May 24, 2021, 09:07 PM IST
रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड) हमाली काम, बस कंडक्टरची नोकरी ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास title=

मुंबई : चित्रपट जगात अनेक स्टार्स असले तरी रजनीकांत यांचं स्थान वेगळं आहे. कारण आजही त्यांचे बरेच चाहते त्यांना देव मानतात.  ७० वर्षांचे अभिनेता खऱ्या आयुष्यात साध्या राहाणीमानासाठी ओळखले जातात. आधी पोर्टर म्हणून आणि नंतर बस कंडक्टर म्हणून काम करत रजनीकांत चित्रपटांपर्यंत पोहोचले आणि वर्षानुवर्षे 'एंथिरन' आणि 'काला' सारख्या अनेक चित्रपटांतून दक्षिण भारतातली एक मोठे स्टार बनले.

सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, रजनीकांत यांचा चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी त्यांचे चाहते रात्रीपासून थिएटरच्या बाहेर रांगेत उभे असतात. त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्या पोस्टर्सला दुधाने अंघोळ घातली आहे, तर काहींनी त्यांच्या कटआउट्सवर फुलं उधळली आहेत तर काहीजण त्यांची मूर्ती बनवून पूजा करतात.

रजनीकांत यांना आपल्या चाहत्यांमध्ये 'थलयवा' म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा किंवा त्यांचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक उत्सव असतो. जपान ते श्रीलंका पर्यंत त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची चाहत्यांची रागंचरांग आहे.

कधीकधी जेव्हा रजनीकांत यांच्या चित्रपटांना समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला यश मिळवून देण्यासाठी त्यांचं नाव अजूनही पुरेसं आहे. गेली पाच दशके त्यांचं नाव केवळ दक्षिण भारतातच नाही तर बॉलिवूडमध्येही गाजत आहे.

बंगळुरुमधील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचं मूळ नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांना चार भावंडं आहेत यापैकी ते सगळ्यात लहान आहेत. शालेय काळापासूनच खेळामध्ये रस असणारे रजनीकांत बंगळूरमधील रामकृष्ण मठात नाटकात भाग घ्यायचे.

१९६६मध्ये त्यांचे वडील निवृत्त झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब बंगळुरुच्या हनुमंता नगरात स्थायिक झाले. तिथे रजनीकांत यांनी हमाल म्हणून काम केलं आणि त्यानंतर बंगळुरू परिवहन महामंडळाच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम केलं. यानंतर, त्यांचा सहकारी ड्रायव्हर आणि मित्र राज बहादूर यांच्या प्रोत्साहनेवर त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा कोर्स पूर्ण केला आणि चित्रपटाच्या कारकिर्दीचा प्रवास सुरू केला.