Fukrey 3 Box Office Collection Day 3: 'Fukrey 3' समोर जवान अपयशी, तिसऱ्या दिवशी केली जबरदस्त कमाई

'फुकरे 3' ने जवानाला मागे सोडण्याचा प्लान आखला आहे. 'फुकरे 3' ने तीन दिवसात जवानपेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे.

Updated: Sep 30, 2023, 07:07 PM IST
Fukrey 3 Box Office Collection Day 3: 'Fukrey 3' समोर जवान अपयशी, तिसऱ्या दिवशी केली जबरदस्त कमाई title=

Fukrey 3 Box Office Collection Day 3 : फुकरे फ्रेंचाइजीने लोकांना पोट धरुन हसायला भाग पाडलं  आहे. नुकताच या फ्रँचायझीचा तिसरा भाग चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून तो चाहत्यांची मने जिंकत आहे. 'फुकरे 3' या सिनेमासोबतच हनी, चूचा, भोली पंजाबन आणि पंडित जी  परत आले आहेत. Fukrey 3 हा समीक्षकांसोबतच चाहत्यांनाही खूप आवडत आहे. हे चित्रपटाच्या कलेक्शनवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. 'फुकरे 3' सोबत आणखी दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत.  दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटत असल्याचं दिसत आहेत.  The Vaccine War आणि Chandramukhi 2 कोणतेही खास कलेक्शन करताना दिसले नाही.  

'फुकरे 3' ने जवानाला मागे सोडण्याचा प्लान आखला आहे. 'फुकरे 3' ने तीन दिवसात जवानपेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे. 'फुकरे 3' चे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. ज्यामध्ये यातही जवानला या सिनेमाने मागे टाकलं आहे. आज आम्ही तुम्हाला या सिनेमाच्या कलेक्शनबद्दल सांगणार आहोत.  

'फुकरे 3' ने कमावले इतके  
आता फुकरे 3 चं तिसऱ्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. त्यानंतर वीकेंडपर्यंत चित्रपट 35-40 कोटींची कमाई करेल असं दिसतंय. Sacknilk अहवालानुसार, Fukrey 3 ने तिसऱ्या दिवशी 10 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.82 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 7.81 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर या सिनेमाचं एकूण कलेक्शन २६.६३ कोटी इतकं आहे.

फुकरे 3 ने शनिवारी 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शाहरुख खानच्या जवानने 8.50 कोटी रुपये कमावले आहेत. त्यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 595.53 कोटी इतके आहे. जवान 600 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या अगदी जवळ आहे.फुकरे 3 बद्दल सांगायचं झालं तर, मृगदीप सिंग लांबा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. पुलकित सम्राट, रिचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, वरुण शर्मा आणि मनजोत सिंग या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.