लग्नाआधीचं प्रेग्नंट झाल्याने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाली, ''मागासलेले विचार...''

Arjun Rampal's Girlfriend​: सध्या चर्चा असते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या रिलेशनशिप्सची आणि अभिनेत्रींच्या पेग्नंन्सीची. अर्जून रामपालची गर्लफ्रेंडदेखील दुसऱ्यांना प्रेग्नंन्ट आहे त्यामुळे तिच्या फोटोशूटही चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. परंतु यावेळी मात्र ती ट्रोल झाली आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Jun 6, 2023, 06:27 PM IST
लग्नाआधीचं प्रेग्नंट झाल्याने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाली, ''मागासलेले विचार...'' title=
June 6, 2023 | Gabriella Demetriades gave reply to the trollers who trolled her of getting pregnant without marriage(Photo : Gabriella Demetriades | Instagram)

Gabriella Demetriades Trolled: लग्नाच्या संकल्पना आता या बदलताना दिसत आहेत. सोबतच तरूण पिढीमध्ये रिलेशनशिप्सच्याही कल्पना बदलत आहेत. लग्नाअगोदरही रिलेशनशिपमध्ये असताना मूल झालं तर ओकेsss ती एक नवी जबाबदारी आहे. इतक्या सहजपणे हा ट्रेण्डही रूजताना दिसतो आहे, खासकरून बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये जास्त. लिव्ह इन रिलेशनशिप आणि मग त्यापुढे मुलंही होण्यास असे कपल्स तयार असतात आणि आपली जबाबदारीही यथायोग्य पार पाडतात. त्यामुळे चाहतेही त्यांची स्तुती करताना दिसतात. परंतु ही आपल्या संस्कृतीला धरून आहे का, हे फॅड किती पसरत जाणार यावरून सोशल मीडियावरही अनेकदा चर्चा होताना दिसते. यावरून सेलिब्रेटींना ट्रोलही केले जाते आणि त्यातून त्यांच्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही दिल्या जातात. 

सध्या याच्या निशाण्यावर अर्जून रामपालची गर्लफ्रेंड आलेली आहे. परंतु यावेळी तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी नक्की काय घडलं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. अर्जून रामपालची गर्लफ्रेंड गेब्रिएला डेमेट्रिएड्स हिनं पुन्हा गरोदर आहे. आपलं बेबी बंपमधील फोटोशूट पोस्ट करत असते. मध्यंतरी तिच्या बेबी बंप फोटोशूटची चर्चा रंगली होती. अर्जून रामपाल आणि गेब्रिएला डेमेट्रिएड्स यांनी लग्न केलेले नाही. परंतु त्यांना एक मुलगा आहे आणि आता पुन्हा एकदा गेब्रिएला प्रेग्नंन्ट असल्यानं त्यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. 

हेही वाचा - रेखाला पाहून 'या' अभिनेत्रीही मोडायच्या कडाकडा बोटं; नेमकं कशामुळं बिनसलं?

लग्नाआधी गरोदर असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तिनं काही दिवसांपुर्वी आपला बेबी बंपमधला एक फोटो शेअर केला होता. यावेळी तिनं आपलं बेबी बंप ओपनिली फ्लॉन्ट केले होते. परंतु तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी नको त्या कमेंट्स केल्या आहेत. यावर एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया दिली की, 'तू लग्नं कधी करणार आहेस? तू भारतात राहतेस. तू जिथे जन्मलीस तिथं राहत नाहीस, तुम्ही सगळे तरूणाची मानसिकता खराब करता आहात'

Gabriella Demetriades gave reply to the trollers who trolled her of getting pregnant without marriage

परंतु या एका ट्रोलरच्या कमेंटवर तिनं सडेतोड उत्तर दिलं आहे. ''हो ना, येथील लोकांची मानसिकता ही सुंदर जीवांना जन्माला घातल्यामुळे खराब केली गेली आहे. मागासलेल्या विचारांच्या लोकांकडून नाही.'' अशी कमेंट गेब्रिएलानं केली आहे. अनेकांनी या कमेंटवर रिप्लाय दिले आहेतय अनेकांनी तिचे कौतुक केले आहे तर तिला काहींनी ट्रोलही केले आहे. अर्जून रामपाल सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे परंतु गॅब्रिएलामुळे तो पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेत आला आहे.