आता घरबसल्या पाहू शकता गदर 2, या OTT प्लॅटफॉर्मवर होतोय रिलीज

'गदर 2' ने 500 कोटींहून अधिक कमाई करून 2023 मधील  सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा हा विक्रम केला आहे. तर 'गदर २' आता लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज आहे.

Updated: Oct 5, 2023, 06:57 PM IST
आता घरबसल्या पाहू शकता गदर 2, या OTT प्लॅटफॉर्मवर होतोय रिलीज title=

मुंबई : सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर 'गदर 2'  11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'गदर: एक प्रेम कथा' चा सिक्वेल 'गदर 2' ला देखील प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन करून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.

'गदर 2' ने 500 कोटींहून अधिक कमाई करून 2023 मधील  सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा हा विक्रम केला आहे. तर 'गदर २' आता लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज आहे. OTT वर तुम्ही हा अॅक्शन ड्रामा कधी आणि कुठे पाहू शकता या बद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

OTT वर 'गदर 2' कधी आणि कुठे पहायचा
'गदर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं आहे. आता हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर दिसणार आहे. मूव्ही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे आणि त्याची ओटीटी रिलीज डेटही जाहीर केली आहे.
 
याबाबतची ट्विटरवर अपडेट शेअर करताना, Zee5 ने या पोस्टला कॅप्शन दिलं, ''काउंटडाउन सुरू! तारा सिंग तुमचं मन जिंकण्यासाठी सज्ज आहे! भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ZEE5 फक्त 2 दिवसात येत आहे! गदर 2 आता ZEE5 वर''

तर आता घरबसल्या सनी देओलचं मोठं, चांगलं आणि बोल्ड अॅक्शन सीन ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी सज्ज व्हा आणि प्रत्येक भारतीयाच्या मनावर राज्य करत असलेला 'हिंदुस्तान झिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा' हा सर्वात लोकप्रिय डायलॉग. राहील. या चित्रपटात सनी देओल त्याच्या प्रसिद्ध हँडपंप सीनची पुनरावृत्ती करताना आणि 'उड़ जा काले कावा', 'मैं निकला गड्डी लेके' सारख्या ओरिजनल चार्टबस्टर्स (2001 चित्रपटातील) वर गाणी आणि डान्स करताना आणि 2001 ची तीच जादू पुन्हा तयार करताना दिसेल.

'गदर 2'मध्ये पुन्हा एकदा तारा आणि सकीनाची जोडी
'गदर २' हा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे. तारा सिंग (सनी देओल) आणि सकीना (अमिषा पटेल) ही आयकॉनिक जोडी 'गदर 2' मध्ये पुन्हा एकदा दिसली आहे. तारा सिंगचा मुलगा चरणजीत  याला मायदेशी आणण्यासाठी पाकिस्तानात परतण्याभोवती चित्रपटाची कथा फिरते. 1947 च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित 'गदर 2' हा 'गदर: एक प्रेम कथा'चा पुढचा सिक्वेल आहे. या चित्रपटाने 526 कोटी रुपयांच्या शानदार कलेक्शनसह बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे.