Reena Roy with Bollywood's Famous Star Kids : बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय यांनी 70-80 चं दशक गाजवलं आहे. रीना यांनी 1972 मध्ये आलेला चित्रपट 'जरूरत' बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रीना यांनी आजवर अनेक चित्रपट केले. त्यात 'काली चरण', 'आदमी खिलौना है', 'प्यासा सावन', 'आशा', 'नसीब' हे चित्रपट आहेत. 19 वर्षांच्या असताना त्यांनी पहिला चित्रपट केला होता. त्यांचा हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. त्यांचा सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत जवळपास 8 सेलिब्रिटी आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार
सध्या रीना रॉय यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोत स्टार किड्सची एक पलटनच पाहायला मिळते. त्यात अभिनेता हृतिक रोशन, त्याची बहीण सुनैना रोशन, निर्माती एकता कपूर, तिचा भाऊ आणि अभिनेता तुषार कपूर, अमजद खानची लेक आणि अभिनेत्री अहलाम खान, तिचा भाऊ आणि अभिनेता शदाब खान, अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि तिची बहीण रिंकी खन्ना दिसत आहेत. या फोटोत हृतिक आणि सुनैना शेजारी बसल्याचे पाहायला मिळते आहे. तर एकता आणि तुषार हे फोटोच्या वरच्या बाजुला आहेत. त्यांच्यासोबत अमजद खान यांचा मुलगा आणि मुलगी आहे. ट्विंकल खन्ना ही रीना यांच्या डाव्या बाजुला आणि तिची बहीण रिंकी ही रीना यांच्या कुशीत आहे.
रीना रॉय यांच्याविषयी बोलायचे झाले तर रीना रॉय यांना खरी ओळख ही 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या कालीचरण या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत शत्रुघ्न सिन्हा हे मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि पुढे त्यांना एकमेकांवर प्रेम झालं. ते दोघं जवळपास 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते असे म्हटले होते. तर शत्रुघ्न सिन्हा यांच्या आयुष्यात पूनम यांची एन्ट्री होताच त्यांच्यात आणि रीना यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला.
शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान यांच्याशी 1983 मध्ये विवाह केला. लग्नानंतर रीना या पाकिस्तानला शिफ्ट झाल्या. तर रीना यांनी 'सनम' या त्यांच्या मुलीला जन्म दिला. मात्र, लग्नाच्या 7 वर्षांनंतर 1990 मध्ये रीना आणि मोहसिन यांचा घटस्फोट घेतला. रीना यांनी त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.