Deepika Padukone and Ranveer Singh Siddhivinayak Mandir : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही लवकरच आई होणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की तिची प्रसुतीची तारिख ही 28 सप्टेंबर आहे. ज्या दिवशी रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. खरंतर या बातमीत किती तथ्य आहे हे कोणालाही माहित नाही. सध्या ती पती रणवीर सिंगसोबत मंदिरात पोहोचली आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्या दोघांना एकत्र पाहून अनेक लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.
दीपिका पदुकोणनं फेब्रुवारीच्या अखेरीस तिच्या प्रेग्नंसीविषयी चाहत्यांना माहिती दिली होती. ज्यावेळी सगळे त्या दोघांच्या विभक्त होण्याविषयी बोलत होते दुसरीकडे त्यांनी ही बातमी देत चाहत्यांना धक्का दिला होता. दुसरीकडे जेव्हा सतत दीपिकाच्या बेबी बंपवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले तर दुसरीकडे दीपिकानं तिचं मॅटर्निटी फोटोशूट करत सगळ्या ट्रोलर्सचं तोंड बंद केलं. या सगळ्यात दीपिका आणि रणवीरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचे हे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत.
विरल भयानीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर हे सिद्धिविनायक मंदिरात पोहोचल्याचे दिसते. त्यांनी आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं दुपारी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी रणवीरनं ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता तर दीपिकानं सिल्क साडी नेसली आहे. या दरम्यान, ते दोघं अणवाणी मंदिरात गेले होते. रणवीरचा हात धरून ती मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे. रस्त्यात भेटणाऱ्या सगळ्या चाहत्यांना ते भेटले. यावेळी ते दोघंच नव्हते तर त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं. दोघांचे आई-वडील देखील यावेळी स्पॉट झाले.
दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसतो. काहींनी तर बेबी बंप पाहून कोणाला आश्चर्य होत नाही आहे. अनेक लोक अंदाज बांधत आहेत तिला मुलगा होणार. एकानं कमेंट केली की 'किती प्रेमळ दिसत होती. माझ्या दीपूला कोणाची नजर लागू नये.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ट्विंस होणार का?' तिसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की 'चांगलं आहे, तुला जुडवा होणार.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'पोट तरी खोटं असल्यासारखं का वाटतंय?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हिचं बेबी बंप करीना कपूर आणि आलिया भट्ट जसं का नाही.'
|
LES
(20 ov) 81/8
|
VS |
BOT
83/4(12.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(19 ov) 131/7
|
VS |
BRN
135/3(17.1 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 7 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19 ov) 131/7
|
VS |
NEP
135/3(17.1 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.