पद्मिनी कोल्हापुरे यांचा हीरो ज्यानं 100 चित्रपटांमध्ये केलं काम; अनिल कपूरसोबत दिसला पण 32 वर्षांपासून बेपत्ता!

Padmini Kolhapure's Co-Actor Who Is Missing From 32 Years : पद्मिनी कोल्हापुरे यांचा सह-कलाकार ज्यांनं ज्याची होती रोमॅन्टिक हीरो अशी ओळख आज 32 वर्ष झाली आहे बेपत्ता...

दिक्षा पाटील | Updated: Sep 6, 2024, 07:24 PM IST
पद्मिनी कोल्हापुरे यांचा हीरो ज्यानं 100 चित्रपटांमध्ये केलं काम; अनिल कपूरसोबत दिसला पण 32 वर्षांपासून बेपत्ता! title=
(Photo Credit : Social Media)

Padmini Kolhapure's Co-Actor Who Is Missing From 32 Years : अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खूप संघर्ष केला आणि स्वत: चं नशिब चमकावलं. पण काही कलाकार असे देखील आहेत, ज्यांनी आयुष्यात खूप काही कमावलं पण ते त्यानंतर यशाच्या शिखरावरून अचानक खाली आले. या कलाकारांमध्ये अनेक कलाकारांची नावं आहेत. त्यापैकी एक कलाकार आहे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता राज किरण महतानी. राज किरण महतानी हे गेल्या 32 वर्षांपासून कोणालाही माहित नाही अचानक गायब झाल्यासारखे आहेत. 

राज किरण यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. बऱ्याच काळापासून त्यांचं कुटुंब हे त्यांचा शोध घेत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दावा करण्यात आला की त्यांना कोणी न्यूयॉर्कमध्ये टॅक्स चालवताना पाहिलं. इतकंच नाही तर अशी माहिती आहे की ते अमेरिकेच्या मनोरुग्णालयात आहेत. त्यांची लेक रिशिका महतानी शाह यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं. 

राज किरणनं तर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. पण यातील ‘कर्ज’ हा त्यांच्या असा चित्रपट राहिला आहे ज्यानं रवी वर्मा यांची भूमिका साकारत त्यांची वेगवेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटात ऋषी कपूर हे मूख्य भूमिकेत दिसले. खरंतर राज किरण यांची ओळख रोमॅन्टिक हीरो म्हणून झाली होती. पण त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत सगळ्यांची मने जिंकली. त्यांनी चित्रपटात सहाय्यक कलाकारांच्या भूमिका साकारल्या. 

राज यांनी त्यांच्या काळात अनेक चर्चेत असलेले चित्रपट केले. ‘बसेरा’, ‘अर्थ’ आणि ‘राज तिलक’ सारखे चित्रपट त्यांनी केले. 'आज का दौर' हा 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी पद्मिनी कोल्हापुरेसोबत काम केलं. इतकंच नाही तर राज यांनी  घर हो तो ऐसा या चित्रपटात अनिल कपूर आणि मीनाक्षी शेषाद्रिसोबत काम केलं. या चित्रपटात त्यांनी सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. 

हेही वाचा : 'शॉर्ट सर्किट, फाल्गुनी पाठक...' अर्शद वारसीच्या मुलाला पाहून लोकांना काय-काय आठवलं!

राज किरण यांची ओळख कधी तर रोमॅन्टिक हीरा म्हणून होती, पण पाहता पाहता ते सहाय्यक अभिनेता झाले आणि एक सारखे चित्रपट साकारू लागले. त्या भूमिकांसाठी त्यांना टाइपकास्ट देखील झाले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्येच सहकालाकाराच्या भूमिका साकारल्या, पण त्यांच्या करिअरला वाचवण्यासाठी 90 च्या दशक येईपर्यंत राज किरण हे अभिनयाच्या जगातून गायब झाले.