Gautami Patil : अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजून एका तरुणाचा गौतमीला मेसेज, तुला कधीच....

Gautami Patil Video : काही महिन्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गौतमी पाटील हे नाव पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कपडे बदलतांना व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. 

Updated: May 12, 2023, 04:22 PM IST
Gautami Patil : अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजून एका तरुणाचा गौतमीला मेसेज, तुला कधीच.... title=
Gautami Patil fan proposed for marriage

Gautami Patil Video :  नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचं (Gautami Patil ) नाव कमी वेळेतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. गौतमी नेहमीच तिच्या सुंदरतेने तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. गौतमी पाटीलवर एकीकडे मोठ्या प्रमाणात टीका होत असते तर दुसरीकडे अजूनही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होत असतो,  पण तरीही तरुण मंडळी तिच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दरम्यान, गौतमीच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते. अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणाने थेट गौतमीकडे लग्नाची मागणी केल्याचे समोर आले आहे. 

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil Video) हिचा ड्रेस बदलतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता. याप्रकरणी 25 फेब्रुवारी 2023 रोजी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे कसून तपास करून प्रसिद्ध नृत्यांगणा यांचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट बनवून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांनाही अटक केली.  या प्रकरणी आरोपी आयुष अमृत कणसे (21, रा. भरतगाववाडी, ता. सातारा) आणि एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. गौतमीचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. याचदरम्यान गौतमीला एका नेटकऱ्याने थेट जोडीदार बनवण्यासाठी मागणी घातली आहे. या नेटकऱ्याने व्हिडीओ खाली कमेंट करत आपल्यावर विश्वास ठेवत आपल्याला जोडीदार बनवण्याची विनंती केली आहे.  

 वाचा : Kartik Aryan च्या कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं; ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करत जिमपर्यंत चालवली बाईक

नुकतेच गौतमीने करीना कपूरच्या गाण्यावर एक रील शेअर केला आहे. यावरुन तिला एका नेटकऱ्याने थेट जोडीदार बनवण्यासाठी मागणी घातली आहे. या नेटकऱ्याने व्हिडीओ खाली कमेंट करत आपल्यावर विश्वास ठेवत आपल्याला जोडीदार बनवण्याची विनंती केली आहे. कमेंट करताना म्हटले की, "गौतमी पाटील तुम्ही खूप सुंदर आहात मला मनापासून आवडतं माझे खूप प्रेम आहे तुमच्यावरती. प्रत्येक अडचणीत साथ देईल, मला समजून घ्या तुम्हाला हवा आहे तसेच जोडीदार आहे मी खूपच सांगतो तुम्हाला कधीच त्रास देणार नाही प्लीज विनंती मला रिप्लाय दे...."अशी कंमेट नेटकऱ्याने केली आहे. 

गौतमी पाटीलची क्रेझ

तमाशाला पर्याय म्हणून नागरिक गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्राधान्य देतात. सगळ्या राज्याला तिने वेड लावल आहे. मात्र अनेक तमाशा कलावंत गौतमी पाटीला तमाशा कलावंत मानत नाहीत. याउलट गौतमी पाटीलमुळे आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे. मात्र गौतमी पाटील हिच्या क्रेझचा कुठलाही परिणा तमाशावर झाला नसल्याचे भारतीय तमाशा परिषदेकडून सांगण्यात आले. 

भावी जोडीदाराबद्दल गौतमी पाटील काय म्हणाली?

एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली, मला प्रसिद्धी, प्रतिष्ठा, बंगला, पैसा... काहीही नको. माझ्या आयुष्यात जी परिस्थिती येईल, त्या परिस्थितीत माझा जोडीदार मला साथ देईल...' असं म्हणाली. गौतमीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण नृताच्या जोरावर गौतमी मोठ्या पडद्यावर झळकणार. गौतमीचा पहिला मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गौतमीच्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'घुंगरू' आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. गौतमी पाटील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमलेली असते. आता लवकरच गौतमी मोठ्या पडद्यावर देखील झळकणार आहे.