महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा Gautami Patil ला फटका; पाहा काय घडलंय

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'घुंगरू' या चित्रपटाची प्रतिक्षा करणाऱ्या तिच्या चाहत्यांना आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 7, 2023, 03:48 PM IST
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा Gautami Patil ला फटका; पाहा काय घडलंय title=
(Photo Credit : Social Media)

Gautami Patil : सतत डान्समुळे चर्चेतच नाही तर वादाच्या भोवऱ्यात अडकणारी गौतमी पाटील सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर गौतमीचं चर्चेत असण्याचं कारण हे कधी तिचा डान्स नाही तर तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील आहेत. काही दिवसांपूर्वी गौतमीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची घोषणा केली होती. गौतमी 'घुंगरू' या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे कळल्यापासून गौतमीच्या सगळ्याच चाहत्यांना आनंद झाला असून तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तर आता या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 

काही दिवसांपूर्वी गौतमीच्या 'घुंगरू' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तो ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची आतुरता वाढली.  या ट्रेलरमध्ये गौतमीच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. पण या सगळ्यात आता अशी बातमी समोर आली आहे की गौतमीच्या या 'घुंगरू' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या उत्सुकतेचा कोणाची नजर लागली असं म्हणायला हरकत नाही. तर आता प्रश्न असा आहे की गौतमीचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? त्याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते बाबा गायकवाड यांनी सांगितले आहे. बाबा गायकवाड म्हणाले की "सध्याची राज्याची राजकीय परिस्थिती पाहता पुढच्या आठ दिवसात चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेची घोषणा करण्यात येईल. याविषयी बोलताना पुढे बाबा गायकवाड म्हणाले, "तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट सगळ्यांनी थिएटरला जाऊन सर्वांनी पाहावा, अशी माझी सर्वांना विनंती आहे”.या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्याचं शूटिंग हे सोलापूर, माढा, हंपी आणि परदेशातही झालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'घुंगरू' चित्रपटात गौतमी लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसणार आहे. स्त्री म्हणून अन्याय झालेली एक लावणीसम्राज्ञीची भूमिका गौतमी साकारते. काहीच दिवसांपूर्वी गौतमीने तिच्या चित्रपटांविषयी बोलताना म्हणाली, “माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका काय असेल हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा." 

हेही वाचा "मुलानं समलैंगिक संबंधात असल्याचं सांगितलं तर...", महेश मांजरेकरांचं सत्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत

गौतमीला लोक तिच्या अश्लील डान्समुळे चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना लाखोंच्या संख्येनं लोक गर्दी करतात. सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख गौतमीला मिळाली आहे. 'घुंगरू' या चित्रपटात गौतमी आणि बाबा गायकवाड यांच्यासोबत सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीतेदेखील झळकणार आहेत.