Gautami Patil's Mother Photo : गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी पाटील ही तिच्या कार्यक्रमांमुळे चर्चेत आहे. तर चर्चेत असण्याचं कारण हे आधी तिची डान्स करण्याची पद्धत होती. तर त्यानंतर कारण ठरलं तिचं आडनाव. गौतमी खरंच पाटील आहे का आणि नाही तर ती हे आडनाव का लावते असे सवाल अनेकांना पडले आहेत. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता गौतमीच्या आईचा फोटो समोर आला आहे. गौतमीनं स्वत: तिच्या आईचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
गौतमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या आईचा आणि तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो गौतमी लहाण असतानाचा आहे. गौतमीच्या आईनं तिला कुशीत घेतलं आहे. तर फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. आईसोबतचा हा फोटो शेअर करत गौतमीनं कॅप्शन दिलं की माझं जग, माझी आई आणि मी. गौतमी अगदीच हुबेहुब तिच्या आईसारखीच दिसतेय. आई आणि गौतमीचा चेहरा फार मिळता जुळता आहे. गौतमीने फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.
गौतमीनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, "किती गोड दिसतेस तू बहेणा." दुसरा नेटकरी म्हणाला, "आई तुझ्यासारखीच दिसते." तिसरा नेटकरी म्हणाला, "तू सेम तुझ्या आईसारखी दिसतेस." आणखी एक नेटकरी म्हणाला, "आईसारखी दिसतेस गं." दुसरा नेटकरी म्हणाला, "तुझ्या आईला सलाम." तिसरा नेटकरी म्हणाला, "तु तुझ्या आई सारखी दिसते." अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी गौतमी ही तिच्या आईसारखी दिसते असं म्हटलं आहे.
हेही वाचा : Adipurush पाहायचाय? जाणून घ्या Advance Booking च्या तारखा; रणबीर कपूर घेतोय 10 हजार तिकिटं
गौतमीच्या वडिलांविषयी बोलायचे झाले तर आपली लेक गौतमी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहे. त्याचा अभिमान पण वाटतो. मात्र काही गोष्टींमुळे तिच्यावर टीका होते तेव्हा दुःख होतं, असं रवींद्र पाटील म्हणाले. आपल्या व्यसनामुळे किंवा कौटुंबीक वादामुळे मुलगी गौतमी ही आणि तिची आई हे दोघे सोबत नसल्याचं मोठं दुःखही रवींद्र पाटील यांना आहे. गौतमीची खूप आठवण येते. ती व तिच्या आईने पुन्हा आपल्या सोबत राहावं हे सांगताना रवींद्र पाटील यांना अश्रू अनावर झाले.एकदा तरी गौतमीने भेटण्यासाठी यावं आपल्याला पुन्हा पप्पा म्हणून हाक मारावी, अशी अपेक्षा तिचे वडील रवींद्र पाटील यांनी त्या व्हिडीओत व्यक्त केली होती.