Siddhant Chaturvedi बिग बींची नात Navya Naveli Nanda च्या प्रेमात, सोशल मीडियावर उघडपणे केलं असं काम...

नव्याने बॉलिवूडमध्ये काम करण्याऐवजी बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे तिचा संपूर्ण वेळ ती तिच्या कामाला देत आहे.

Updated: Feb 14, 2022, 08:46 PM IST
Siddhant Chaturvedi बिग बींची नात Navya Naveli Nanda च्या प्रेमात, सोशल मीडियावर उघडपणे केलं असं काम... title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्याच्या गहराईया सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट नुकता  OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून सिद्धांतच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सिद्धांतने या आधी बंटी और बबली आणि गली बॉय या चित्रपटात देखील काम केलं आहे. त्याने या दोन्ही चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सर्वांवरती सोडली आहे. त्यामुळे त्याचे आता अनेक चाहातेही आहेत.

सिद्धांत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो तो त्याच्या लूक आणि स्टाईलमुळे, परंतु आता सिद्धांत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला सिद्धांत डेट करत असल्याच्या चर्चा आता होत आहेत.

नव्याने बॉलिवूडमध्ये काम करण्याऐवजी बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे तिचा संपूर्ण वेळ ती तिच्या कामाला देत आहे. तसेच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि आनंदाचे क्षण नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

सध्या नव्याने तिच्या प्रोजेक्टशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे युनायटेड नेशनसोबतच्या नवीनच्या आगामी प्रोजेक्ट्समधील आहे. ज्यावर सिद्धांतने कमेंट केली, ज्यामुळे दोघांच्या डेट करण्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धांतने काय कमेंट केली?

इस्टावर अपलोड केलेल्या या फोटोंमध्ये नव्या हसताना दिसत आहे. नव्याच्या या पोस्टवर एक अशी कमेंट आली ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नव्याच्या या पोस्टवर सिद्धांत चतुर्वेदीने कमेंट केली आहे.

या पोस्टवर सिद्धांतने हार्ट कमेंट केला आहे. गेल्या वर्षभरापासून सिद्धांत आणि नव्या डेटिंग करत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यात तिच्या पोस्टवर सिद्धांतने हार्ट पोस्ट केल्यामुळे लोकांनी दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचे कन्फर्म झालं आहे. परंतु दोघांपैकी कोणीही यागोष्टीबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.