सेलिब्रीटी असूनही जेनिलियाची 'ही' गोष्ट अत्यंत खास, जाणून तुम्हीही व्हाल थक्क

सेलिब्रिटी जेनिलियाची 'ही' गोष्ट जाणून तुम्हीही व्हाल थक्क, तुम्ही करणार असं?  

Updated: Aug 6, 2022, 09:55 AM IST
सेलिब्रीटी असूनही जेनिलियाची 'ही' गोष्ट अत्यंत खास, जाणून तुम्हीही व्हाल थक्क title=

मुंबई : महाराष्ट्राची वहिनी अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे जेनिलिया देशमुख. अभिनेता रितेश देशमुखची पत्नी जेनिलियाने वयाच्या 16 व्या वर्षी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. 'तुझे मेरी कसम' हा तिचा पहिला सिनेमा.  या सिनेमाच्या सेटवर जेनिलियाची रितेश देशमुखशी भेट झाली आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं. दोघे कायम अनेकांना कपल गोल्स देत आसतात. रितेश आणि जेनिलियाच्या नात्याच्या चर्चा कायम रंगत असतात. पण आता जेनिलियाची एक गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

सध्या जेनिलिया ज्या कारणामुळे चर्चेत आली आहे, ते म्हणजे अभिनेत्रीच्या लग्नातील लेहेंगा. स्वतःच्या लग्नातील लेहेंगा कोणीही पुन्हा घालत नाही. पण जेनिलियाने स्वतःच्या लग्नातील लेहेंगा दीर आणि भावाच्या लग्नात देखील घातला. 

सेलेब्स एकदा घातलेला ड्रेस पुम्हा घालत नाहीत, परंतु 2012 मध्ये अभिनेत्रीने दीर धीरज देशमुखच्या लग्नात स्वतःच्या लग्नातील लेहेंगा घातला होता. यावरून हे स्पष्ट होते की जेनेलियाला हा लेहेंगा खूप आवडतो. एवढंच नाही तर 2015 साली जेनिलियाने भावाच्या लग्नातही तोच लेहेंगा घातला.... 

डिझायनर लेहेंग्सचा विचार केला तर सब्यसाचीचे नाव अव्वल स्थानी असतं. या लेहेंग्याचा क्लासिक लुक आणि रंग भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतो. कदाचित हेच कारण असेल, जेनिलियाने स्वतःच्या लग्नातील लेहेंगा दीर आणि भावाच्या लग्नातही घातला असेल.