Genelia Deshmukh Video : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. जिनिलियानं हिंदी चित्रपटांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतही तिची छाप सोडली आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. तिचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
जिनिलियाचा हा व्हिडीओ पिंकव्हिलानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलिया रेस्टॉरंटमधून बाहेर येत असताना फोनवर बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिनिलिया फोनवर बोलत असताना तिच्या गाडीची प्रतिक्षा करताना दिसते. यावेळी रस्त्यावर उभी असणारी दोन मुलं तिच्या मागे जात तिला विचारतात की 'तू हिरोईन आहेस ना?' असं म्हणत तिच्या दिशेने येऊ लागली. त्यांचा आवाज ऐकताच जिनिलीया त्यांच्याजवळ आली आणि अभिनेत्रीने हसत-खेळत त्यांची विचारपूस करू लागली. यावेळी सगळ्यात आधी जिनिलिया त्यांना म्हणाला की 'तुम्ही मला कसं ओळखता?, माझा कोणता चित्रपट पाहिलात? मला नाव सांगा… तर याशिवाय जिनिलियानं त्या मुलांना आणखी बरेच प्रश्न विचारले.
हेही वाचा : बोलो जुबा केसरी! एवढी टीका होऊन अक्षयनं पुन्हा केली पान मसाल्याची जाहिरात, पुन्हा ट्रोल
जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की आपल्याला यांच्यासारखे अभिनेता आणि अभिनेत्री हवेत जे समजाला समान दर्जा देतात आणि त्याशिवाय त्यांच्या मुलांना देखील तेच करायला सांगतात. दुसरा नेटकरी म्हणाला, 'जिनिलीया मनाने खरंच चांगली आहे'. तिसरा नेटकरी म्हणाला, 'तिच्याऐवजी दुसरी कोणी अभिनेत्री असती, तर त्या मुलांच्या बाजूला थांबलीदेखील नसती'. आणखी एक नेटकरी म्हणाला की 'जिनिलीया-रितेश दोघेही सामान्य लोकांप्रमाणे वागतात…खूप चांगले आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'इतकंच नाही तिनं त्या मुलीचा हात देखील धरला होता.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जिनिलियावर खूप चांगले संस्कार आहेत.'
जिनिलियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘ट्रायल पीरेड’ या चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. तिच्या या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात जागा केली होती.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.