Akshay Kumar Trolled : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मिशन रानीगंज हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट 80 च्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारीत आहे. या सगळ्यात अक्षय त्याच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. त्याची ही जाहिरात पाहून सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर चला जाणून घेऊया संपूर्ण संपूर्ण प्रकरण काय आहे.
अक्षयची एक नवीन जाहिरात आहे. जो अभिनेता रियल लाईफ हिरोंच्या आयुष्यावर चित्रपट बनवतो तोच अभिनेता त्याच्या जाहिरातींमुळे ट्रोल होतो. खरंतर, अक्षय कुमारच्या अनेक भूमिका आहेत जयांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. पण अक्षयची आता जाहिरातीत अशी कोणती भूमिका आहे ज्यानं प्रेक्षकांच्या मनाला धक्का बसला आहे आणि त्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या जाहिरातीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं असून ही जाहिरात पान मसालाची आहे. या आधी अक्षय कुमारनं पान मसालाची जाहिरात केल्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली होती. त्यासोबत त्यानं म्हटलं होतं की अशी जाहिरात परत करणार नाही. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप दरम्यान चाहत्यांना धक्का बसला जेव्हा त्यांनी पान मसाला ब्रॅन्डची नवी जाहिरात पाहिली. या प्रदर्शित झालेल्या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगन आणि अक्षय कुमार दिसले होते.
जाहिरातीची सुरुवात ही शाहरुख खान आणि अजय देवगणपासून होते. ते दोघे अक्षय कुमारच्या घराखाली रस्त्यावर त्याची प्रतिक्षा करत असतात. तर दुसरीकडे अक्षय कुमार हा हेडफोन लावून गाणी ऐकण्यात व्यग्र असतो. अजय एकीकडे गाडीचा हॉर्न वाजवतो तर दुसरीकडे शाहरुख गाडीत असलेला टेनिस बॉल घेऊन अक्षयच्या खिडकीवर निशाना साधत फेकतो. मात्र, तो बॉल दुसऱ्याच मुलीच्या खिडकीला जाऊन लागतो. हे पाहता ती मुलगी रागात बाहेर येते आणि शाहरुखवर ओरडताना दिसते. तर शाहरुख थेट त्याची सगळी जबाबदारी ही अजय देवगणवर ठकलत त्यानं केलं असं सांगत त्याच्यावर जबाबदारी ठकलतो. यानंतर अजय विमलचं एक पॅकेट उघडतो. त्या विमलच्या पॅकेटमधून येणारी सगळी अक्षर ही अक्षयचं लक्ष वेधतात आणि तो धावत खिडकीजवळ येतो. खाली शाहरुख आणि अजय देवगणला पाहून तो लगेच खाली येतो.
हेही वाचा : पुन्हा एकत्र आले समांथा आणि नागा चैतन्य? अभिनेत्यानं शेअर केलेल्या 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधान
अक्षयची ही जाहिराच सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या जाहिरातीला पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की 'अक्षयला लोकांना काय वाटतं ते ऐकावं लागेल. त्यानं म्हटलं होतं की तंबाखूची जाहिरात करणार नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अक्षय कुमार म्हणाला होता की तो आता पान मसाल्याची जाहिरात करणार नाही कारण जेव्हा पहिल्यांदा विमलची जाहिरात केली होती तेव्हा त्याच्या चाहत्यांना आनंद झाला नव्हता. मग त्यानं असं का केलं?'
|
BOT
(20 ov) 114/7
|
VS |
LES
30(10.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 84 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(14.3 ov) 91
|
VS |
SA
93/3(16.4 ov)
|
| South Africa beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.