'प्रेक्षक चित्रपटगृहात येऊ नये म्हणून उत्तम मार्ग'

चित्रपट समिक्षक राजा सेन यांची प्रतिक्रिया...

Updated: Oct 11, 2020, 01:01 PM IST
'प्रेक्षक चित्रपटगृहात येऊ नये म्हणून उत्तम मार्ग'

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आतापर्यंत  देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख ५३ हजार ८०७  इतकी झाली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र आता केंद्र सरकार देशात अनलॉकच्या ५ व्या  टप्प्यामध्ये चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. 

चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर अभिनेता विवेक ऑबेरॉय स्टारर 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर आता चित्रपट समिक्षक राजा सेन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

एक ट्विट करून त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  'हॅट्स ऑफ! प्रेक्षक चित्रपटगृहात येऊ नये म्हणून उत्तम मार्ग.' त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर आधारलेला चित्रपट २०१९ साली प्रदर्शित करण्यात आला होता.

परंतु हा चित्रपट अपयशी ठरला. चित्रपट गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार रूपेरी पद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांनी केले आहे.