नवी मालिका 'घेतला वसा टाकू नको'

नवी मालिका झी मराठीवर

Updated: Feb 22, 2021, 12:34 PM IST
नवी मालिका 'घेतला वसा टाकू नको'

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवीन कथा घेऊन मार्च महिन्यात 'झी मराठी' नवीन मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. मनोरंजनाचा विचार करताना 'उत्सव नात्यांचा, नवीन कथांचा' या घोषवाक्यासह झी मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अशीच एक नवीन कथा ७ मार्च पासून संध्याकाळी ६.३० ला प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, या मालिकेचं नाव आहे "घेतला वसा टाकू नको" ही मालिका पौराणिक कथांवर आधारित असणार आहे, आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजी कडून किंवा आई कडून 'एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता' या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, ह्याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात पाहिला मिळणार आहेत. या निमित्ताने झी मराठीवर एक वेगळा प्रयोग होत आहे.

ही मालिका संपूर्ण कुटुंबासाठी एक अनोखी पर्वणी असणार आहे, ह्या मालिकेची सुरुवात 'वेध भविष्याचा' च्या माध्यमातून घरघरात पोहोचलेले 'पं.अतुलशात्री भगरे' गुरुजी करणार आहेत. तेव्हा सज्ज व्हा आपण ऐकलेल्या या कथा आपल्या मुलांसोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासाठी तेही मालिका रूपात. "घेतला वसा टाकू नको" ७ मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.