झी मराठीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

या वेळेत सुरू होणार नवी मालिका 

Updated: Feb 22, 2021, 12:24 PM IST
झी मराठीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) प्रत्येक मालिका ही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. प्रत्येक मालिकेचं एक वेगळेपण झी मराठीने आतापर्यंत जपलं आहे. झी मराठीवरील अनेक मालिका आणि मालिकेतील पात्र ही प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Varyachi Bayko) . ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. ७ मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होत आहे. राधिका सुभेदारने गृहिणी ते यशस्वी उद्योजिकापर्यंत गाठलेला प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. 

यावेळी  झी मराठीवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'घेतला वसा टाकू नका'  (Ghetala Vasa Taku Nako) ही नवी मालिका सुरू होणार आहे. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रोजच्या धाटणीपेक्षा वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पौराणिक कथा वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. भगरे गुरूजी ही कथा मांडणार आहे. 

त्याचप्रमाणे झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अण्णा नाईक आणि शेवंता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'नाईकांचा वाडा' आता कशा अवस्थेत असणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.  सोशल मीडियावर अण्णा नाईक परत येणार आहे, अशी चर्चा रंगली होती. आता मालिकेचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ही मालिका बदलणार वेळ 

झी मराठीवरील मालिका 'लाडाची मी लेक गं' ही दुपारी २.३० वाजता दाखवण्यात येणार आहे. या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे.