मुंबई : वादविवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा सिनेमा अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे.
लॉन्ग विकेंडचा फायदा उचलत,विरोधकांच्या धमक्या झुगारून प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. चार दिवसांमध्ये 'पद्मावत'ने 100 कोटींचा पल्ला पार केला आहे.
'पद्मावत' चित्रपटातील अनेक दृश्यांवर समाजातील काही घटकांनी निषेध नोंदवला होता. त्यापैकी एक म्हणजे 'घुमर' गाणं. घुमर हे पद्मावतमधील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं.त्यामधील दीपिकाचा रॉयल अंदाज आबालवृद्धांवर भुरळ घालणारा ठरला. प्रदर्शनावेळेस या चित्रपटातील गाण्यात दीपिकची कंबर तंत्रज्ञानाच्या मदतीने झाकून पुन्हा नवं गाणं प्रदर्शित करण्यात आले. 'या' मुलांचे घुमर नृत्य पाहिले का ?
राजस्थानी पारंपारिक नृत्य 'घुमर' करताना दीपिकाने चाहत्यांची मनं जिंकली. दीपिकाच्या चाहत्यांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश होता. साडी नेसून 'घुमर' करताना तिचा अंदाज लाजबाब होता.
चिमुकलीच्या 'घुमर' नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर होत आहे.
When the first fandom reaches even the youngest generation, a very cute video of #Ghoomar @deepikapadukone #DP1stDay1stShow pic.twitter.com/KqZ9KFqocM
— Deepika First Day First Show Club (@dp1stday1stshow) January 25, 2018
this is beyond anything I could have ever imagined or asked for!!! Thank You my little one! May you be blessed with joy & happiness forever!! https://t.co/OpcjeRoDTy
— Deepika Padukone (@deepikapadukone) January 26, 2018
दीपिकाने चिमुकलीच्या प्रयत्नाचे कौतुक करताना ट्विटरवरून तिला शुभेच्छा देताना अभिनंदनही केले.