सुष्मितासाठी सोन्याचा दिवस, बॉयफ्रेंडकडून शुभेच्छांचा वर्षाव

सिनेस्टार नेहमीच स्वतःचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात. 

Updated: May 21, 2019, 07:52 PM IST
सुष्मितासाठी सोन्याचा दिवस, बॉयफ्रेंडकडून शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबई : सिनेस्टार नेहमीच स्वतःचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात. प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनसुद्धा सोशल मीडियावर अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांना कळवत असते. सुष्मिता सेन तितक्याच उत्साहाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडींची माहिती सोशल मीडियावर अपडेट करत असते. सुष्मिता सेनने २१ मे रोजी मिस यूनिवर्सचा किताब आपल्या नावावर केला होता. जुन्या आठवणींना उजाळा देत तिने तिच्या आयुष्यातील सोनेरी दिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सुष्मिताच्या या महत्वाच्या दिवशी तिचा बॉयफ्रेंड रोहमानने देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनोख्या मार्गाने त्याने सुष्मितावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. 

 

height: 1138px; width: 640px;

height: 1137px; width: 640px;

सुष्मिताने या मानाच्या किताबावर आपले नाव कोरून २५ वर्षे झाली आहेत. सौंदर्यवतींच्या या स्पर्धेमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसह तिचा सामना झाला होता. दोघींना विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये सुष्मिताने बाजी मारली.

'कोणत्या ऐतिहासिक घटनेला बदलता आलं असतं, तर ती घटना कोणती असती?' तेव्हा ऐश्वर्याने 'आपल्या जन्माची वेळ' असे उत्तर दिले, तर सुष्मिताने 'इंदिरा गांधींचा मृत्यू' असे उत्तर दिले.