Khupte Tithe Gupte Supriya Sule : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते करत आहे. या कार्यक्रमाचं तिसरं सीझन सुरु आहे. या कार्यक्रमात आजवर अनेक राजकारणीपासून सेलिब्रिटींपर्यत अनेकांनी हजेरी लावली आहे. आता या कार्यक्रमात सुप्रिया सुळे दिसल्या आहेत. त्यावेळी त्यांना अनेक गोष्टींविषयी विचारण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्या पहिल्यांदा खासदार झाल्या तेव्हा शरद पवार काय म्हणाले होते याविषयी सांगितलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना अवधुत गुप्तेनं विचारलं की एक वडील म्हणून तुमच्याकडून पवार साहेब कसे आहेत हे प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. त्यावर उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'ते फार मार्गदर्शन करत नाहीत, ते फार कमी बोलतात. ज्या दिवशी मी पहिल्यांदा लोकसभा निवडून गेले, त्या दिवशी मला गाडीतून जाताना सहा जनपतवरून निघाले तेव्हा... मला अजूनही ती गोष्ट आठवते. मला ते एक गोष्ट म्हटले होते की आज तू पहिल्यांदा गेट नंबर 1 नी लोकसभेची खासदार म्हणून जातेस. एक लक्षात ठेव आयुष्यभर... गेट नंबर एकच्या ज्या पायऱ्या आहेत ना... त्या तुला चढण्यासाठी जी संधी मिळाली आहे. ती फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतदारांमुळे मिळालं आहे. दरवेळीस पायऱ्या चढताना जो पर्यंत तू या मतदारांना लक्षात ठेवशील... तो पर्यंत ही पायरी चढता येईल. ज्या दिवशी त्या मतदारांना विसरशील, तेव्हा पायरी चढता येणार नाही.
हेही वाचा : फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला रेखा यांनी लगावली कानशिलात! VIDEO समोर
त्याआधी समोर आलेल्या व्हिडीओत अवधूत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारतो की 'उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहे? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?' तर अवधुतच्या या प्रश्नावर उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अर्थात, अजित पवार.' त्यानंतर पुढे अवधुत गुप्ते सुप्रिया सुळेंना एक प्रश्न विचारतो की कोणत्या पुतण्याचं काका विरोधात असलेलं बंड योग्य होतं असं वाटतं? त्याच्या ऑप्शनमध्ये राज ठाकरे, धनंजय मुंडे की अजित पवार ... मात्र, यावर आता सुप्रिया सुळे काय उत्तर देतील याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.