Guess Who : शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : अनेक मुली शाळेच्या ड्रेसमध्ये उभ्या आहेत. यातील एक मुलगी ही मोठी होऊन बॉलिवूडची टॉप स्टार बनली आहे. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यासोबत तिने काम केले आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना खुप आवडला होता. 

Updated: Dec 2, 2022, 04:33 PM IST
Guess Who : शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का? title=

Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहानपणीचा फोटो आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखता येतेय का पाहा. 

फोटोत काय़?

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, अनेक मुली शाळेच्या ड्रेसमध्ये उभ्या आहेत. यातील एक मुलगी ही मोठी होऊन बॉलिवूडची टॉप स्टार बनली आहे. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यासोबत तिने काम केले आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना खुप आवडला होता. सध्या ती सिनेमापासून दुर आहे. मात्र ती छोट्या पडद्यावर झळकताना दिसते.

हे ही वाचा : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

कोण आहे अभिनेत्री? 

या फोटोतील अभिनेत्रीने बॉलिवूडमधले आघाडीचे हिरो शाहरूख खान, सलमान खाण आणि अक्षय कुमारसोबत काम केले आहे. तिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तिचे अनेक चित्रपट प्रेक्षकांना आवडले देखील आहेत. जर तुम्ही अजुनही या मुलीला ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो, हा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा बालपणीचा फोटो आहे.

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. शिल्पाने बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले आहे. त्यांना दोन मुले आहेत. तिने 1993 मध्ये बाजीगर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच तिने कॉलीवूड, तेलुगू आणि कर्नाटक चित्रपटांमध्येही काम केले आहे. शिल्पा चित्रपटांव्यतिरिक्त ती टीव्ही शोमध्येही दिसते.