Shweta Tiwari Trolled For Kissing Son On Lips : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. श्वेता तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. इतकच काय तर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. श्वेताने नुकतंच तिचा मुलगा रेयांशला Lip Kiss करतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. (Shweta Tiwari Son Reyansh)
काही दिवसांपूर्वी श्वेतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुलाला सहाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थीम पार्कमधील काही फोटो शेअर केले होते. रेयांशच्या वाढदिवसाच्या दिवशी श्वेतानं त्याच्यासोबत खूप सुंदर वेळ व्यथित केला. त्या दोघांनी त्या दिवशी आइस स्केटिंग, स्विमिंग आणि अनेक अॅडव्हेंचर करण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या. पण या सगळ्या फोटोंमध्ये असा एक फोटो होता जो प्रेक्षकांना आवडला नाही. तो फोटो म्हणजे श्वेताचा लेक रियांशला Lip Kiss करतानाचा फोटो.
मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत श्वेतानं कॅप्शन देत म्हणाली की 'सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सगळ्यात चांगली जागा. येथे मला खूप मज्जा आली. रेयांशचा वाढदिवस इतक्या सुंदर पद्धतीनं साजरा करण्यासाठी तुमचे आभार. त्यासोबत श्वेतानं निर्माता विकास कालांतरी याचे हे सगळं मॅनेज करण्यासाठी आभार मानले आहे.
हेही वाचा : Sukesh Chandrashekhar च्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात Nora Fatehi माफीची साक्षीदार
श्वेताचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तिला कळत नाही का सहा वर्षाच्या लहान मुलाला Lip Kiss करते. दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, बेशरम आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, अगं बाई गालावर किस करायचं ना ओठांवर काय करते. (shweta tiwari gots troll for kissing son reyansh on the lips)
रेयांश हा श्वेताचा पूर्वाश्रमीचा पती अभिनव कोहली आणि तिचा मुलगा आहे. ते विभक्त झाल्यापासून रेयांश हा आई श्वेतासोबत राहतो. श्वेता ही नेहमीच तिची मुलगी पलक आणि मुलगा रेयांशसोबत वेळ घालवताना दिसते. श्वेताचं या आधी दोन वेळा लग्न झालं आहे. दोन्हीवेळा तिचा घटस्फोट झाला आहे.