Guess Who : फोटोत दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

आमिर, सलमान आणि अक्षय कुमारची सिनेमात होती हिरोईन, 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Updated: Nov 12, 2022, 06:42 PM IST
Guess Who : फोटोत दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का? title=

मुंबई : सोशल मीडियावर स्टार कलाकारांचे (Actress) अनेक फोटो व्हायरल (Photo Viral) होत असतात. यातील काही फोटो हे लहाणपणीचे असतात, तर काही फोटो हे प्रौंढ अवस्थेतले असतात. असाच आता एका अभिनेत्रीचा लहाणपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील अभिनेत्रीला तुम्हाला ओळखायचे आहे. 

फोटोत काय? 

फोटोत (Photo Viral) एक लहान मुलगी पलंगावर झोपली आहे. या फोटोत ती सुंदरशी स्माईल देतेय.अभिनेत्रीचा (Actress) हा लहानपणीचा खुप सुंदरसा फोटो आहे. या फोटोवरून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे. हा फोटो पाहून तुम्हाला अभिनेत्री ओळखता येत नसेल, तर आम्ही तुम्हाला काही हिंट देतो. ही मुलगी आता मोठी झाली आहे आणि अनेक साऊथ चित्रपटांमध्ये झळकली आहे. बॉलीवूडमधील (Bollywood) अनेक हिट चित्रपटांचाही ती भाग आहे. ती केवळ दक्षिणेचीच नाही तर बॉलिवूडच्या सुपरस्टार्सचीही नायिका आहे. तसेच ती बॉलिवू़डमध्ये आमिर खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांची हिरोईन देखील होती. 

'ही' आहे ती अभिनेत्री?

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून असिन (Asin) आहे. असिनने तिच्या करिअरची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटातून केली, त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. असिनने (Asin) आमिर खान, सलमान खान आणि अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.असिनने 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्माशी लग्न केले आणि अभिनयातून ब्रेक घेतला. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे.

गजनी हा हिंदी चित्रपट तिच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण या चित्रपटानंतर तिच्या आयुष्यात अनेक चित्रपटांची लाईन लागली. गजनी, रेडी, बोल बच्चन, ऑल इज वेल या चित्रपटांसह असिन (Asin) अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती.