...म्हणून 21 वर्षीय तरुणाने Girlfriend च्या घरासमोर स्वत:ला उडवून दिलं; जागीच मृत्यू

Karnataka Man Blows Himself Up: या स्फोटामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा दुर्देवी अंत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 31, 2024, 08:41 AM IST
...म्हणून 21 वर्षीय तरुणाने Girlfriend च्या घरासमोर स्वत:ला उडवून दिलं; जागीच मृत्यू title=
या प्रकरणात पोलिसांनी सुरु केला तपास (प्रातिनिधिक फोटो)

Karnataka Man Blows Himself Up: एका तरुणीने प्रेयसीच्या घरासमोरच जिलेटीनच्या कांड्याचा वापर करुन स्वत:ला उडवून दिल्याची विचित्र घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या घरच्यांनी तिचं या मुलाबरोबर लग्न लावून देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या या 21 वर्षीय मुलाने स्वत:ला उडवून दिलं. या दुर्घटनेमध्ये 21 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तीन महिने तुरुंगामध्ये काढले

कर्नाटकमधील काल्लेनहल्ली गावामध्ये रविवारी सकाळी हा विचित्र प्रकार घडला. या प्रकरणामध्ये मरण पावलेल्या तरुणाचं नाव रामचंद्रा असं आहे. 21 वर्षीय रामचंद्रा हा कर्नाटकमधील मांड्या शहरामधील नागमंगला मूळचा रहिवाशी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्रा हा एका अल्पवयीन मुलीबरोबर रिलेशनशीपमध्ये होता. मागील वर्षी याच प्रकरणामध्ये त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणाअंतर्गत लहान मुलीला प्रेमप्रकरणात अडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये रामचंद्राला अटक करण्यात आली होती. तो तीन महिने तुरुंगामध्ये होता. त्याच्याविरुद्ध या प्रकरणामध्ये खटला सुरु आहे, असं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

घरच्यांनी घेतला तो निर्णय अन्...

तीन महिन्यानंतर तुरुंगात सुटल्यानंतर रामचंद्राने या मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि त्यांच्यातील हे प्रकरण कोर्टाबाहेरच मिटल्याने त्याच्याविरोधातील खटला मुलीच्या कुटुंबियांनी मागे घेतला. मात्र दुसरीकडे रामचंद्रा आणि या मुलीने एकमेकांबरोबरचं नातं लपूनछपून सुरु ठेवलं. या मुलीच्या घरच्यांनी रामचंद्रापासून तिची सुटका करण्यासाठी तिचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या वयात आल्यानंतर तिचं लग्न लावून देण्याचा घरच्यांचा विचार होता, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जिलेटीनची कांडी पेटवली आणि...

रामचंद्रा हा मुलीच्या घरच्यांनी केलेलं नियोजन ऐकून संताप व्यक्त केला. रागाच्या भरातच तो मुलच्या घरी गेला. त्याने आधी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे बाचाबाची झाली. रामचंद्रा आपल्यासोबत जिलेटीनची कांडी घेऊन गेला होता. त्याने ती जिलेटीनची कांडी पेटवली आणि त्याचा स्फोट झाला. या स्फोटात रामचंद्राचा मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू संशयास्पद

रामचंद्राच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आमच्या मुलाचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. रामचंद्राचे कुटुंबीय खडी फोडण्यासंदर्भातील कामात असल्याने त्याला जिलेटीनची कांडी याच संदर्भातून मिळाल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर येत आहे. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करत असून नेमकं या अल्पवयीन मुलीच्या घरासमोर काय घडलं? याचा शोध घेतला जात आहे.