15 चित्रपटांपैकी एकच हिट, शाहरुखसोबत दिसलेला 'हा' अभिनेता प्रभास, रणबीर कपूरपेक्षा श्रीमंत

Zayed Khan Net Worth: अभिनेत्याने फक्त 15 सिनेमे केले मात्र त्यातील एकच हिट ठरला पण आज या हिरोकडे कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 31, 2024, 09:34 AM IST
15 चित्रपटांपैकी एकच हिट, शाहरुखसोबत दिसलेला 'हा' अभिनेता प्रभास, रणबीर कपूरपेक्षा श्रीमंत  title=
Zayed Khan Net Worth How the Actor built a 1500 crore empire after flop career

Zayed Khan Net Worth: तुम्हाला अभिनेता जायद खान माहितीये का? चुरा लिया हे तुमने या चित्रपटातून त्याने करिअरला सुरुवात केली होती. मात्र काही ठराविक चित्रपट केल्यानंतर त्याने बॉलिवूडला रामराम ठोकला. मात्र, चित्रपटात काम न करताही या अभिनेत्याकडे आज कोट्यवधींची संपत्ती आहे. आज जायद कमाईच्या बाबतीत सुपरस्टार अभिनेता प्रभास, रणबीर कपूर आणि अल्लू अर्जुन यांनाही मागे टाकलं आहे. या अभिनेत्याच्या कमाईचे साधन काय, हे जाणून घ्या. 

जायद खानच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर मै हूं ना या चित्रपटात त्याने शाहरुख खानसोबत काम केले आहे. हाच सिनेमा त्याचा एकमेव हिट झाला आहे. 2003मध्ये 22 वर्षांचा असताना त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जायदने काही सोलो चित्रपटदेखील केले आहेत. मात्र, त्यात त्याला यश आलं नाही. फाइट क्लब, मिशन इस्तांबुल, तेज सारख्या चित्रपटात त्याने काम केलं होतं. मात्र त्याचा एकही चित्रपट चालला नाही. त्याचा शेवटचा चित्रपट शराफत गई तेल लेने हा 2015मध्ये रिलीज झाला होता. जायदने आत्तापर्यंत 15 चित्रपटात काम केले आहे. मात्र त्यातील एकच हिट ठरला होता. 

जायद हा संजय खान यांचा मुलगा आणि अभिनेता फिरोज खान यांचा पुतण्या आहे. जेव्हा जायद खानला लक्षात आलं की त्याला या क्षेत्रात यश मिळणार नाही तेव्हा त्याने स्वतःचे लक्ष व्यवसायात घातले. त्याच्याकडे बिझनेस मॅनेजमेंटची पदवी आहे. त्याने त्याच्या या ज्ञानाचा वापर करत अनेक स्टार्टअप आणि व्यवसायात गुंतवणुक केली. यात गुंतवणुक केल्यामुळं त्यांचा नफा वाढत गेला आणि हळुहळु व्यवसायात त्याचा जम बसत गेला. 

एका रिपोर्टनुसार, जायद खानकडे एकूण संपत्ती 1500 कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र जायदने आत्तापर्यंत त्याच्या कमाईचा आकडा सांगितला नाहीये. एका मुलाखतीत त्याला त्याच्या कमाईबाबत विचारण्यात आल्यावर त्याने फक्त हसून त्यावर प्रतिक्रिया दिली. पण जर कमाईचा हा आकडा खरा असेल तर फ्लॉप फिल्मि करियर असतानाही आजच्या सुपरस्टारपेक्षा जास्त श्रीमंत आहे. रणबीर कपूरकडे 550 कोटी, प्रभास 400 कोटी, अल्लू अर्जून 350 कोटी आणि राम चरण 1300 कोटींची कमाई आहे.