'गली बॉय' सिनेमाचे धमाकेदार प्रमोशन सुरु

 गुरुवारी भायखाळा येथे  झालेल्या म्यूझिक लॉन्चवेळी दोन्ही कलाकार त्यांच्या सह-कलाकारांसह झळकले.

Updated: Jan 26, 2019, 06:37 PM IST
'गली बॉय' सिनेमाचे धमाकेदार प्रमोशन सुरु title=

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग सध्या त्यांच्या 'गली बॉय' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. गुरुवारी भायखाळा येथे  झालेल्या म्यूझिक लॉन्चवेळी दोन्ही कलाकार त्यांच्या सह-कलाकारांसह झळकले. रणवीर, आलिया, डिवाइन आणि सिद्धार्थ चतुर्वेदी यांनी 'अपना टाइम आएगा' या गाण्यावर थिरकले. कार्यक्रमात रणवीरने आपल्या आनोख्या अंदाजात चाहत्याचे मनोरंजन केले. हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या चाहत्यामध्ये रणवीरने उडी मारली. त्यानंतर त्याने स्वत:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केला.

म्यूझिक लॉन्चवेळी अभिनेता अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन नंदा ही उपस्थित होती. कार्यक्रमात आलियाने रॅप न गाता सिनेमातले काही डायलॉग बोलून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचबरोबर चाहत्यांना सिनेमागृहात जाउन सिनेमा बघण्याचा आग्रह केला. 

 

या सिनेमातून रॅपरचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. तरूणांना रणवीरचा हा लूक आणि त्याची स्टाइल अतिशय पसंत आली आहे. सिंबानंतर या सिनेमातून रणवीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.